कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Updated: Sep 4, 2018, 11:33 PM IST
कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल title=

मुजफ्फरपूर : प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एका शाळेच्या आवारात कुमार सानू यांच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्सर्टमध्ये रात्री १० नंतरही लाऊड स्पीकरचा वापर करण्यात आला. या लाऊड स्पीकरचा त्रास झाल्यामुळे काही रहिवाशांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या कॉन्सर्टचे आयोजक अंकित कुमार यांच्याविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. २ सप्टेंबर रोजी बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.