‘डान्स महाराष्ट्र डान्स’ च्या सेटवर ३ वर्षाच्या छोट्या आर्यन ने केले, प्रार्थना बेहरेला प्रपोझ

  झी युवाववरील डान्स महाराष्ट्र डान्स, हा कार्यक्रम सध्या अतिशय गाजत आहे.या व्यासपीठावर सध्या अनेक सिने - कलाकार भेट देत आहेत. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 13, 2018, 10:36 PM IST
‘डान्स महाराष्ट्र डान्स’ च्या सेटवर  ३ वर्षाच्या छोट्या आर्यन ने केले, प्रार्थना बेहरेला प्रपोझ

मुंबई :  झी युवाववरील डान्स महाराष्ट्र डान्स, हा कार्यक्रम सध्या अतिशय गाजत आहे.या व्यासपीठावर सध्या अनेक सिने - कलाकार भेट देत आहेत. 

या बुधवारी दाखवण्यात आलेल्या भागामध्ये वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे त्यांच्या आगामी चित्रपट व्हाटसएप लग्न चे प्रमोशन करताना दिसले. या भागात डान्स महाराष्ट्र डान्स या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेला ३ वर्षाच्या आर्यन या स्पर्धकाने सगळ्याचे मन जिंकले. 

या कार्यक्रमाचा निवेदक नेहमीप्रमाणे जेव्हा प्रार्थना बेहरे बरोबर त्याच्या स्टाईल मध्ये फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा ३ वर्षाचा आर्यन व्यासपीठावर 'एक मिनिट एक मिनिट' करत आला आणि तडक मोर्चा प्रार्थना बेहरे कडेच वळवला. प्रार्थना बेहरे ला भेटल्यावर त्याने चक्क " कुछ कुछ होता है प्रार्थना, तुम नाही समजोगी ' असा फिल्मी डायलॉगच मारला आणि परीक्षक, प्रेक्षक यांनी मनसोक्त हशा व टाळ्यांची दाद दिली.

 

एवढं करून हा पठ्ठा थांबला नाही तर "आपके पैर जमीन पे मत राखिये , वरना मैले हो जायेंगे " "एक बार जो मैने कमिटमेंट करली , तो मैं खुदकी भी नाही सुनता "असे अनेक डायलॉग मारले आणि मजा म्हणजे हे सगळे डायलॉग त्याने त्याच्या बोबड्या आवाजात मारले. त्याला बघून प्रार्थना त्याला म्हणाली " तुझं मी काय करू ...चाऊ का? " हे ऐकून तर एकच हशा पिकला. निवेदक सुव्रत जोशी ने त्याची ओळख करून देताना सांगितले की, हा बच्चू ३ वर्षाचा आहे, आणि सेट वर आतापर्यंत ३ वेळा आला आहे, आणि त्याच्या ३ हेरॉईन बरोबर होणारी सेटिंग तोडून गेला आहे . " यावर तर सगळ्यांची मजा घेतली. प्रार्थना बेहरेने अनाऊन्स केले कि आर्यन हा माझ्या पुढच्या सिनेमा चा हिरो असेल. 

 प्रकारे अनेक गमती जमती, डान्स महाराष्ट्र डान्स च्या सेटवर घडत असतात. हा व्यासपीठ ४ वर्षांवरील प्रत्येक नृत्य प्रेमींसाठी खुला आहे त्यावर कोणत्याही डान्स प्रकारचे कसलेही बंधन नाही. यात एखादा डान्सर सोलो किंवा ग्रुपमध्ये आणि मुख्य म्हणजे विविध नृत्यशैली लोकांसमोर आणू शकतो.आजपर्यंत कोणत्याही वाहिनीने या प्रकारचा खुला मंच डान्सर साठी उपलब्ध करून दिला नाही आणि हेच डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाचे वेगळेपण आहे . ह्या प्रकारची मजा प्रेक्षकांना दर बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता झी युवावार पहायला मिळू शकेल.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close