वाढदिवसादिवशीच रणवीरसोबत दीपिका करणार साखरपुडा?

 बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी हे नवे वर्ष आनंद घेऊन येणार आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 3, 2018, 06:08 PM IST
वाढदिवसादिवशीच रणवीरसोबत दीपिका करणार साखरपुडा?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी हे नवे वर्ष आनंद घेऊन येणार आहे. पद्मावतीच्या वादावर आता कुठे पडदा पडला आहे आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा झेंडा मिळेल, असे चित्र निर्माण झाले आहे. ही दिलासा देणारी बातमी असतानाच दीपिकाबद्दल अजून एक आनंददायी बातमी आहे.

असा करणार वाढदिवस खास

५ जानेवारीला दीपिकाच्या वाढदिवसादिवशी ती आपला बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबत साखरपू़डा करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही सध्या श्रीलंकेत आहेत. ५ जानेवारीला दीपिका आपला ३२ वा वाढदिवस साजरा करणार आहे. तो दिवस अधिक स्पेशल करण्यासाठी दीपिका त्या दिवशीच रणवीरसोबत साखरपूडा करणार आहे. 

चाहते उत्सुक

रणवीर-दीपिकाने कधीही आपले नात्याची उघडपणे कबुली दिलेली नाही. दोघे अनेकादा एकत्र असतात. त्यांच्या जोडीचे अनेक फॅन्स देखील आहेत.  फॅन्स पद्मावती चित्रपटासाठी अत्यंत उत्सुक आहेत. यात शाहीद कपूरही मुख्य भुमिकेत आहे. हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होईल. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close