वडीलांना जीनवगौरव मिळतानाच्या क्षणी भावूक झाली दीपिका..

दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदूकोण यांना भारतीय बॅडमिंटन संघाकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 30, 2018, 12:48 PM IST
वडीलांना जीनवगौरव मिळतानाच्या क्षणी भावूक झाली दीपिका.. title=

नवी दिल्ली : दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदूकोण यांना भारतीय बॅडमिंटन संघाकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी त्यांनी देशातील खेळाच्या स्तराबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी प्रतिभावान खेळाडूंना योग्य वेळी आणि योग्य वयात पुरेशा सुविधा मिळाल्यास दिग्गज खेळाडू तयार होतील, असे मत त्यांनी मांडले. 

 भावूक झाली दीपिका

प्रकाश पदुकोण यांना प्रशस्तीप्रत्र, शाल, स्मृतिचिन्ह आणि १० लाख रुपये देवून सत्कार करण्यात आला. यावेळेस त्यांनी आपल्या परिवाराचे आभार मानले. आई-वडील, भांवडं, पत्नी आणि मुली यांना धन्यवाद दिले. याप्रसंगी दीपिका काहीशी भावूक झाली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.

काय म्हणाले प्रकाश पदुकोण?

भारतीय बॅडमिंटन संघाकडून जीवनगौरव पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ होती. आणि पहिल्याच वर्षी हा सन्मान प्रकाश पदुकोण यांच्या वाट्याला आल्याने त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट होती. यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले. पढे ते म्हणाले की, बॅडमिंटनने आज जी प्रगती केली आहे त्यामुळे मी अत्यंत खूश आहे. बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूंची आणि टूर्नामेंटची संख्या वाढली आहे. त्यामुळे क्रिकेटनंतर बॅडमिंटन देशातील दुसरा लोकप्रिय खेळ झाला आहे.
मात्र यावरच समानाध मानता कामा नये. अजून चांगले करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. बीएआय आणि राज्य संघांना खेळाडूंमधील प्रतिभा ओळखण्याच्या दिशेने काम करायला हवे. प्रत्येक क्षेत्रात कमीत कमी एक अकादमी असालयला हवी, ज्याचा खर्च सरकार किंवा बीएआय करेल.

खेळाडूंना निराश करू नका

सहयोग, मदत किंवा साहाय्य योग्य वयात आणि योग्य वेळेत मिळायला हवे. अन्यथा खेळाडू निराश होतात आणि खेळ सोडून निघून जातात. त्यामुळे देशालाही प्रतिभावान खेळाडू मिळत नाहीत. जर खेळाला योग्य समर्थन मिळाले तर भारत देखील चीन, इंडोनेशिया, मलेशिया, जपान यांसारख्या देशाच्या बरोबरीला येईल. 

त्याचबरोबर पदुकोण म्हणाले की, भारतातील बॅडमिंटनच्या प्रगतीत खेळ मंत्रालय आणि भारतीय खेळ प्राधिकरण यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. मी हे ठामपणे म्हणू शकतो की, त्यांच्या योगदानाशिवाय बॅडमिंटन खेळ हे स्थान प्राप्त करू शकले नसते.