संजय लीला भंसाळींना दिसते दीपिकामध्ये 'या' तीन अभिनेत्रींची झलक

अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या सौंदर्याचे अनेकजण दिवाने आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत' चित्रपटामधील तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संजय लीला भंसाळींनी मात्र दीपिकाचे कौतुक करताना तिला फार मोठी कॉम्प्लिमेंट दिली आहे. 

Updated: Feb 23, 2018, 05:23 PM IST
संजय लीला भंसाळींना दिसते दीपिकामध्ये 'या' तीन अभिनेत्रींची झलक  title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या सौंदर्याचे अनेकजण दिवाने आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत' चित्रपटामधील तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संजय लीला भंसाळींनी मात्र दीपिकाचे कौतुक करताना तिला फार मोठी कॉम्प्लिमेंट दिली आहे. 

दीपिकामध्ये दिसते तीन अभिनेत्रींची छाप  

एका मुलाखतीमध्ये बोलताना दीपिका पादूकोनचे कौतुक करताना संजय लीला भंसाळी म्हणाले, ' मी जेव्हा दीपिकाला पाहतो तेव्हा एका अ‍ॅन्गलने तिच्याकडे पाहिल्यास वैजंयतीमाला दिसते, काही वेळेस तिच्याकडे पाहिल्यास हेमामालिनींची छाप दिसते  तर दीपिकाला घुमर डान्स करताना पाहिल्यास वहीदा रेहमानजींची छाप दिसते. दीपिका पादुकोनची या तिघांसमोर उभं राहण्याची क्षमता आहे.  

पद्मावत बॉक्सऑफिसवर सुपरहीट 

पद्मावत या चित्रपटाच्या रीलिजच्या वेळेस अनेक वाद विवाद रंगले होते. मात्र रीलिजचा मार्ग मोकळा झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर 280 कोटींची कमाई केली होती. 
चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान दीपिकाच्या अभिनयामुळे प्रभावित झाल्यानंतर 500 रूपयांची नोट बक्षीस म्हणून दिले होते. 

जोहरच्या सीनचे केले कौतुक  

पद्मावत चित्रपटातील 'जौहर' चा सीन करताना दीपिकाने महिलांना ज्या अंदाजात संबोधित केले ते पाहून संजय लीला भंसाळी प्रभावित झाले होते. त्यानंतर बक्षीस म्हणून 500रूपयांची भेट दिली होती. ही भेट करोडोंच्या गिफ्टपेक्षा मौल्यवान असेल असे त्यांनी सांगितले आहे.  

पद्मावत चित्रपटापूर्वी दीपिका पादूकोण आणि संजय लीला भंसाळी यांनी ' राम लीला' आणि 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटामध्ये काम केले आहे.