दीपिका पादुकोण सलग दुसर्‍यांदा ठरली 'सेक्सिएस्ट वुमन अलाईव्ह'

अभिनेत्री दीपिका पादुकोण हीने सलग दुसर्‍यांदा 'सेक्सिएस्ट वुमन अलाईव्ह' हा किताब पटकावला आहे. 

Updated: Oct 18, 2017, 10:11 AM IST
दीपिका पादुकोण सलग दुसर्‍यांदा ठरली 'सेक्सिएस्ट वुमन अलाईव्ह' title=

मुंबई: अभिनेत्री दीपिका पादुकोण हीने सलग दुसर्‍यांदा 'सेक्सिएस्ट वुमन अलाईव्ह' हा किताब पटकावला आहे. 

दीपिकाने २००७ साली 'ओम शांती ओम' या चित्रपटातून हिंदी सिनेमात पदार्पण  केले. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत शाहरूख खानही होता. त्यानंतर दीपिकाने अनेक हीट सिनेमे दिली. 'ऐश्वर्य' या कन्नड चित्रपटातून दीपिकाने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. 

हिंदी सिनेमाप्रमाणेच दीपिकाने हॉलिवूडमध्येही काम केले. विन डिझेलसोबत दीपिकाने xXx: Return of Xander Cage मध्ये काम केले. सध्या संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या रिलीजसाठी दीपिका सज्ज आहे. यामध्ये दीपिकासोबत शाहीद कपूर आणि रणवीर सिंग झळकणार आहे. 

दीपिका नैराश्याच्या विळख्यात अडकली होती. याची कबुलीदेखील तिने प्रसारमाध्यमांसमोर दिली आहे. यामधून बाहेर पडण्याचा ती अजूनही प्रयत्न करत आहे. दीपिकाने 'डिप्रेशन' (नैराश्य) चा सामना करणार्‍यांसाठी 'लीव्ह लव्ह लाफ' ही एनजीओदेखील सुरू केली आहे. 

दीपिका ही प्रकाश पादुकोन या प्रसिद्ध बॅडमिंटनपटूची मुलगी आहे.