VIDEO : सरकारी कार्यालयात 'कजरा रे कजरा रे' आणि 'घूमर पर ठुमके' सारख्या गाण्यांवर डान्स

सरकारी कार्यालयात बॉलिवूडच्या गाण्यांवर जेव्हा कर्मचारी डान्स करतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑफिसच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी चक्क बॉलिवूड गाण्यांवर डान्स केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवण्यात आली होती. आणि या पार्टीतील हा व्हिडिओ आहे. 

VIDEO : सरकारी कार्यालयात 'कजरा रे कजरा रे' आणि 'घूमर पर ठुमके' सारख्या गाण्यांवर डान्स  title=

मुंबई : सरकारी कार्यालयात बॉलिवूडच्या गाण्यांवर जेव्हा कर्मचारी डान्स करतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑफिसच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी चक्क बॉलिवूड गाण्यांवर डान्स केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवण्यात आली होती. आणि या पार्टीतील हा व्हिडिओ आहे. 

मध्यप्रदेशमधील या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ नेमक्या कोणत्या दिवसाचा आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र या व्हिडिओतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याच म्हटलं जात आहे. 

बर्थ डे सेलिब्रेशन 

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ देवास जिल्ह्यातील महिला बाल विकासच्या चामुंडामध्ये असलेल्या कार्यालयातील आहेत. या कार्यालयातील अधिकाऱ्याच्या वाढदिवशी कर्मचाऱ्यांनी सेलिब्रेशन केलं आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी कर्मचारी काम सोडून डान्स करत आहेत. हा व्हिडिओ तिथेच असलेल्या एका कर्मचाऱ्याने शूट केला आहे. 

हा व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

हा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने तयार केला आहे. आणि आता हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ पुरूष कर्मचाऱ्यांसोबत महिला कर्मचारी देखील डान्स करत आहेत.