दिव्यांकाला गोळी लागल्याचे पाहून सेटवरच रडू लागले फॅन्स

मालिका जगतातील प्रसिद्ध सून इशिता भल्ला अर्थात दिव्यांका त्रिपाठी हिचे फॉलोअर्स एखाद्या बॉलीवूड स्टारपेक्षा कमी नाहीयेत. 

Updated: Aug 13, 2017, 09:26 PM IST
दिव्यांकाला गोळी लागल्याचे पाहून सेटवरच रडू लागले फॅन्स title=

मुंबई : मालिका जगतातील प्रसिद्ध सून इशिता भल्ला अर्थात दिव्यांका त्रिपाठी हिचे फॉलोअर्स एखाद्या बॉलीवूड स्टारपेक्षा कमी नाहीयेत. सीरिअलमध्ये जेव्हा इशिताच्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा तितकेच दु:ख तिच्या चाहत्यांनाही होते. 

असेच काहीसे ये है मोहोब्बते या मालिकेच्या सेटवर पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या सेटवर शूटिंग पाहण्यासाठी दोन मुली आल्या होत्या. या दोघाही इशिताच्या मोठ्या चाहत्या. आपल्या फेव्हरिट इशिताला पाहून त्यांना फार आनंद झाला मात्र अचानक दोघी रडू लागल्या.

जेव्हा सेटवरील इतरांनी त्यांना रडण्याचे कारण विचारले तेव्हा इशिता गोळी लागल्याने आपण रडत असल्याचे त्यांनी सांगितले. हे ऐकून सेटवरचे सगळेच हैराण झाले. काही केल्या त्यांचे रडू थांबेना. 

यावेळी खुद्द इशिता अर्थात दिव्यांका त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना समजावले. सेटवर जे काही घडले ते खरं नसतं. मी पूर्णपणे ठीक आहे. मला काही झालेले नाही, असे तिने त्या दोन मुलींना सांगितले. 

 

Omg....ishuu got hurt see the mark of bullet & blood #divyankatripathi #Ishimaa #IshitaBhalla #MrsDahiya #Inspiration #Yhm @divyankatripathidahiya

A post shared by Hitarthi_dtd fanpage (@divyanka_thequeenofhearts) on