सलमानने ‘रेस ३’साठी घेतलेले मानधन ऎकून इतर बॉलिवूड स्टार होतील हैराण!

नुकताच खुलासा झालाय की, अभिनेता सलमान खान ‘रेस ३’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे. सध्या सलमान ‘टायगर जिंदा है’ सिनेमाचं शूट करत आहे. त्यानंतर तो ‘रेस ३’चं शुटिंग सुरू करणार आहे.

Updated: Sep 14, 2017, 06:52 PM IST
सलमानने ‘रेस ३’साठी घेतलेले मानधन ऎकून इतर बॉलिवूड स्टार होतील हैराण!

मुंबई : नुकताच खुलासा झालाय की, अभिनेता सलमान खान ‘रेस ३’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे. सध्या सलमान ‘टायगर जिंदा है’ सिनेमाचं शूट करत आहे. त्यानंतर तो ‘रेस ३’चं शुटिंग सुरू करणार आहे.

दिग्दर्शक रेमो डिसुजा हा अबुधाबीमध्ये लोकेशन फायनल करण्यासाठी गेला आहे. आता या सिनेमाबाबत आणखी एक गोष्ट समोर आली आहे. सलमान खान याने या सिनेमासाठी इतकं मानधन मागितलं आहे की, सर्वांची बोबडी वळेल.  

डेक्कन क्रॉनिकलनुसार, सलमान खान ‘रेस ३’ सिनेमातील प्रॉफिट शेअर करणार आहे. एका सोर्सनुसार, सिनेमाच्या निर्मात्यानी सांगितले की, ‘रेस ३’च्या कमाईतील ७० टक्के भाग सलमान खान घेणार आहे. आतापर्यंत सलमान खान हा त्याच्या सिनेमातील ५० टक्के प्रॉफीट स्वत:कडे ठेवायचा. महत्वाची गोष्ट म्हणजे निर्मात्यांनी सलमान खानची ही मागणी मान्य केली आहे. 

एका ट्रेड एक्सपर्टनुसार, ‘ही एक मोठी मागणी आहे. पण आमिर खान आता त्याचे सिनेमे स्वत: डिस्ट्रीब्यूट करणार आहे. इंडस्ट्रीचा जवळपास प्रत्येक मोठा स्टार त्यांच्या सिनेमाच्या कमाईतील मोठा भाग स्वत:कडे ठेवतात. तरीही सलमान खान याने घेतलेली फि फारच जास्त आहे’.

‘रेस ३’मध्ये सलमान खानसोबत जॅकलिन फर्नांडिस बघायला मिळणार आहे. यासोबतच या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा याचीही भूमिका असणार आहे.