‘या’ अभिनेत्यामुळे तब्बू अजूनही अविवाहीत!

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आज आपला ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसामुळे आणि ‘गोलमाल अगेन’ या सिनेमामुळे तिच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चाही होत आहे.

Updated: Nov 4, 2017, 03:33 PM IST
‘या’ अभिनेत्यामुळे तब्बू अजूनही अविवाहीत! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आज आपला ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसामुळे आणि ‘गोलमाल अगेन’ या सिनेमामुळे तिच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चाही होत आहे.

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तब्बूने वेगवेगळ्या सिनेमांमध्ये तितक्याच दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आजही तिची क्रेझ बघायला मिळले. सर्वच ठिकाणी तब्बूने आपली छाप सोडली आहे. पण रिअल लाईफमध्ये मात्र तब्बूला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पडद्यावर सर्वांना हिरोसोबत रोमान्स करणारी तब्बू लाईफमध्ये क्लीन बोल्ड झाली आहे. तब्बू ४६ वर्षांची होऊनही अजून अविवाहीत आहे. लग्न न करण्यामागेही एक कारण आहे. जे कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

असे सांगितले जाते की, तब्बूने तिचं करिअर जोरात असताना एका अभिनेत्यावर जिवापाड प्रेम केलं होतं. ते प्रेम इतकं घट्ट होतं की, त्याची जागा आजपर्यंत दुसरं कुणीही घेऊ शकलं नाही. अनेक अडचणींमुळे तब्बू त्या अभिनेत्यासोबत लग्न करू शकली नाही. आणि त्याच्यानंतर दुस-या कुणाशी तिला लग्नही करावं वाटलं नाही.

तब्बूच्या स्वप्नातील राजकुमार होता साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता नागार्जुन. एक वेळ अशी होती की, तब्बू आणि नागार्जुनच्या प्रेमाची मोठी चर्चा होत होती. काही मॅगझिननुसार, तब्बू नागार्जुनवर खूप प्रेम करायची. ज्यामुळे ती मुंबई सोडून हैदराबादमध्ये रहायला गेली होती. पण तब्बूचं नशीब इतकं खोटं निघालं की, तिला तिचं ते प्रेम मिळालं नाही.

मिडिया रिपोर्टनुसार, तब्बू आणि नागार्जुनचं प्रेम साधारण १५ वर्षांपर्यंत सुरू होतं. नंतर दोघे वेगळे झाले. वेगळं होण्याचं कारण होतं नागार्जुनचं आधीच विवाहीत असणं. असे सांगितले जाते की, नागार्जुन आपल्या पत्नीला आणि मुलांना सोडून दुसरा संसार थाटणार नव्हता. ज्यामूळे तब्बूने त्याच्यापासून दूर जाणेच योग्य ठरवले.

भलेही तब्बू आणि नागार्जुनचं यांच्यातील नातं संपलं असलं तरी आजपर्यंत तब्बू तिचं प्रेम विसरू शकली नाहीये. कदाचित हेच कारण असेल की, तब्बूने ४६ वर्षांची झाली तरी लग्न केलं नाही.