व्हिडिओ: ड्रीमगर्ल हेमा मालिनींचा तोल जाताच किंग खानने दिला आधार

स्टेजच्या पायऱ्या चढत असताना हेमा मालिनी यांचा पाय अडखळतो, त्यांच्या पायातील चप्पल निघून पडते. या वेळी शाहरूख त्यांची चप्पल उचलतो आणि त्यांच्या पायाजवळ नेऊन ठेवतो.

Updated: May 5, 2018, 01:57 PM IST
व्हिडिओ: ड्रीमगर्ल हेमा मालिनींचा तोल जाताच किंग खानने दिला आधार title=

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये (सोशल मीडिया) सध्या  चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शाहरूख खान 'ड्रीमगर्ल' हेमा मालिनी यांना स्टेजवर घेऊन जातानाचा आहे. या व्हिडिओत शाहरूख हेमा मालिनी यांना मोठ्या आदबीने स्टेजवर घेऊन जाताना दिसतो. दरम्यान, स्टेजच्या पायऱ्या चढत असताना हेमा मालिनी यांचा पाय अडखळतो आणि काहिसा तोलही जातो. त्यांच्या पायातील चप्पल निघून खालच्या पायरीवर पडते. या वेळी शाहरूख त्यांची चप्पल उचलतो आणि त्यांच्या पायाजवळ नेऊन ठेवतो.

 एक जबरदस्त नजारा

दरम्यान, हा प्रसंग घडल्यावरही शाहरूख आणि हेमा मालिनी स्टेजवर जातात आणि एका गाण्यावर दोघे डान्स करतात. विशेष म्हणजे हेमा मालिनीही शाहरूखचे बोट पकडून स्टेजवर एक गिरकी घेतात. स्टेजवर शाहरूख खान, हेमा मालिनी आणि 'ड्रीम गर्ल' या गाण्यावर दोघांचा डान्स. एक जबरदस्त नजारा. व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.

सर्व वयोगटात शाहरूख लोकप्रिय

अभिनेता शाहरुख खान हा गेली अनेक दशकं बॉलिवूडमध्ये नेहमीच आघाडीवर राहिला आहे. तसेच, जवळपास सर्वच जनरेशनमध्ये आपला खास असा चाहता वर्ग निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला आहे. इतकेच नव्हे तर, अभिनयासोबतच तो एक ग्रेड सेंस ऑफ ह्युमर मॅन आणि गुड ह्युमन बींगसुद्धा राहिला आहे.

 

 

A post shared by Shah Rukh Khan  600K  (@srkking1) on