इतके आहे 'तारक मेहता..' मधील कलाकारांचं शिक्षण!

छोट्या पडद्यावर यशस्वीरीत्या १० वर्षे पूर्ण केलेली कॉमेडी मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा ची लोकप्रियता अजूनही सुतभरही कमी झाली नाही. 

Updated: Aug 4, 2018, 08:52 AM IST
इतके आहे 'तारक मेहता..' मधील कलाकारांचं शिक्षण! title=

मुंबई : छोट्या पडद्यावर यशस्वीरीत्या १० वर्षे पूर्ण केलेली कॉमेडी मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा ची लोकप्रियता अजूनही सुतभरही कमी झाली नाही. २८ जुलै २००८ ला ऑनएअर आलेली ही मालिका यशाचे दशक पूर्ण करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि हेच या मालिकेचे यश ठरले. 
दया, जेठालाल, चंपकदादा, टप्पू सेना, सेक्रेटरी भिडे, माधवी भाभीसह शोमधील सर्वच पात्र आपल्याला आपली वाटू लागली. या पात्रांबद्दल अधिक जाणून घ्यायला प्रत्येकालाच खूप आवडेल. तर आज आपण जाणून घेऊया या मालिकेतील तुमचे लाडक्या कलाकारांचे नेमके शिक्षण किती झाले आहे ते....

दयाबेन गडा (दिशा वाकाणी) 

  • डिप्लोमा इन ड्रामा

जेठालाल गडा ( दिलीप जोशी)

  • बी. कॉम (एन. एस. कॉमर्स कॉलेज, मुंबई) 

बबिता अय्यर (मुनमुन दत्ता)

  • इंग्रजीत मास्टर डिग्री

पत्रकार पोपटलाल (श्याम पाठक)

  • सी.ए.

अंजली मेहता (नेहा मेहता)

  • परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मास्टर डिग्री (महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी)
  • डिप्लोमा इन ड्रामा

आत्माराम भिडे (मंदार चंदावरकर)

  • मेकॅनिकल इंजिनिअर

माधवी भिडे (सोनालिका जोशी) 

  • थिएटरमध्ये बी.ए.
  • फॅशन डिझायनिंग

कृष्णन सुब्रमण्यम अय्यर (तनुज महाशब्दे)

  • मरिन कम्युनिकेश डिप्लोमा

चंपकलाल गडा ( अमित भट्ट)

  • बी.कॉम.

तारक मेहता (शैलेश लोढा)

  • पोस्ट ग्रॅज्युएशन इन मार्केटिंग

नट्टू काका (घनश्याम नायक)

  • दहावी पास

रोशन सिंग सोढी (गुरुचरण सिंग)

  • डिग्री इन फार्मेसी

सुंदरलाल (मयुर वाकाणी)

  • एम.ए. इन इंडियान कल्चर
  • स्क्लप्चर आणि ड्रामात डिप्लोमा