'एक, दो, तीन'... पहिल्यांदा माधुरी आता जॅकलीन!

९० च्या दशकात तेजाब चित्रपटातल्या 'एक दो तीन...' गाण्यानं माधुरी दीक्षित नावाच्या सुपरस्टारला जन्म दिला. आता २९ वर्षांनी 'बागी-२' मध्ये हे गाणं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. माधुरीच्या गाण्यावर जॅकलिन फर्नांडिस थिरकणार आहे.

Updated: Mar 17, 2018, 03:45 PM IST
'एक, दो, तीन'... पहिल्यांदा माधुरी आता जॅकलीन! title=

मुंबई : ९० च्या दशकात तेजाब चित्रपटातल्या 'एक दो तीन...' गाण्यानं माधुरी दीक्षित नावाच्या सुपरस्टारला जन्म दिला. आता २९ वर्षांनी 'बागी-२' मध्ये हे गाणं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. माधुरीच्या गाण्यावर जॅकलिन फर्नांडिस थिरकणार आहे.

तेजाब १९८८ मधला ब्लॉकबस्टर सिनेमा... या सिनेमातील 'एक दोन तीन...' या गाण्यानं अक्षरश सर्वांवर 'मोहिनी' घातली... गाणं सुपरडुपर हिट झालं... या चित्रपटानं, खरं तर त्या एका गाण्यानं एक सुंदर चेहरा आणि गोड गळा बॉलिवूडला मिळाला... आणि दोघांनीही मागे वळून पाहिलंच नाही. सुंदर चेहऱ्याची मराठमोळी माधुरी दिक्षित आणि गोड गळ्याची अलका याज्ञिक... दोघांनीही आपापला काळ गाजवला... आजही त्यांची जादू कायम आहे.

अंकुश आणि प्रतिघात असे दोन हिट सिनेमे दिल्यानंतर एन चंद्रां याच्या 'तेजाब' चित्रपटानं हॅटट्रिक साधली. त्यावर्षी चार फिल्मफेअर पुरस्कारांवर तेजाबने नाव कोरलं. अनिल कपूरला त्याच्या कारकिर्दीतील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळाला. एक दोन तीन गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी सरोज खान यांनी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठीचा, अल्का याज्ञिक यांना याच गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा आणि कमलेश पांडे यांना उत्कृष्ट संवादासाठी पुरस्कार मिळाले. 

नवख्या माधुरी दिक्षितला सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून पुरस्कार मिळाला नसला तरी नॉमिनेशन मिळण्याचा पहिला आनंदही तिच्यासाठी पुरस्कारापेक्षा कमी नव्हता... तेव्हापासून माधुरीने बॉलिवूडला 'मोहिनी' घातली ती आजतागायत. एक गाणं... आणि त्या गाण्यामुळे यशाची चव चाखणारे एक दोन तीन चार असे अनेक... सर्व जण यशाच्या शिखरावर पोहचले होते.

३० मार्चला हे गाणं रसिकांना भेटीला येईल... माधुरीने अजरामर केलेलं गाणं पुन्हा करण्याचं धाडस जॅकलिनंन केलंय खरं परंतु ती प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होणार का, जॅकलिनच्या रुपातील मोहिनीला प्रेक्षक स्विकारणार का? हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेलच... पण तोपर्यंत माधुरीचे चाहते १९८८ च्या दशकातल्या त्या आठवणी पुन्हा एकदा जागवतील यात शंकाच नाही.