प्रभासच्या 'साहो'त एवलीनची एन्ट्री

हा एक अॅक्शन सिनेमा असल्यानं ती यासाठी मोठी तयारी करतेय.

Updated: Apr 20, 2018, 07:21 AM IST
प्रभासच्या 'साहो'त एवलीनची एन्ट्री  title=

मुंबई : 'बाहुबली'फेम अभिनेता प्रभासचा आगामी सिनेमा 'साहो'मध्ये श्रद्धा कपूर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात आणखीन एका अभिनेत्रीची एन्ट्री झालीय. 'ये जवानी है दिवानी' या सिनेमात रणबीर कपूरसोबत दिसलेली अभिनेत्री एवलीन शर्माही या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी एवलीन खूपच मेहनत घेताना दिसतेय. यासाठी तीनं तब्बल 10 किलो वजनही कमी केलंय.

एवलीननं या सिनेमाशी निगडीत माहिती आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर करत दिली आहे. या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्यानं एवलीन खूपच खुश आहे. हा एक अॅक्शन सिनेमा असल्यानं ती यासाठी मोठी तयारी करतेय.

उल्लेखनीय म्हणजे या सिनेमात नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ यांसारखे कलाकारही दिसणार आहेत.

'बाहुबली'नंतरचा प्रभासचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. प्रभासचे चाहते त्याच्या या सिनेमाची आतूरतेनं वाट पाहत आहेत.