Filmfare Awards 2018 : शाहरूख,अक्षयला मागे टाकत 'हा' ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता

काल रात्री मुंबईत यंदाचा फिल्मफेअर सोहळा रंगला.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 21, 2018, 10:22 AM IST
Filmfare Awards 2018 : शाहरूख,अक्षयला मागे टाकत 'हा' ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता title=

मुंबई : काल रात्री मुंबईत यंदाचा फिल्मफेअर सोहळा रंगला.

हिंदी सिनेसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणार्‍या फिल्मफेअर अवॉर्ड्सला कलाकारांनी त्यांच्या हटके अंदाजामध्ये हजेरी लावली होती.  

 

 

शाहरूख खान आणि करण जोहर या सुपरहीट जोडीनेच यंदाच्या सोहळ्याचे सूत्रसंचलन केले. दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये रंगलेल्या या अवॉर्ड सोहळ्यात अक्षय कुमार, रणवीर सिंह आदी कलाकारांनी त्यांचे परफॉर्मन्स सादर केले. 

पहा कोणी जिंकले अवॉर्ड्स  

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - राजकुमार राव (बरेली की बर्फी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - मेहर विज (सिक्रेट सुपरस्टार)
सर्वोत्कृष्ट चित्रपट ( लोकप्रिय ) - हिंदी मिडीयम
सर्वोत्कृष्ट चित्रपट  (क्रिटिक्स अवॉर्ड ) - न्यूटन
सर्वोत्कृष्ट अभिनेता ( क्रिटिक्स अवॉर्ड ) - राजकुमार राव ( ट्रप्ड)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( क्रिटिक्स अवॉर्ड )  - झायरा वासीम (सिक्रेट सुपरस्टार)
सर्वोत्कृष्ट अभिनेता ( लोकप्रिय ) - इरफान खान (हिंदी मिडीयम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  (लोकप्रिय )  - विद्या बालन ( तुम्हारी सुलू)