दिग्दर्शक ओम राऊतच्या 'तानाजी'चा फर्स्ट लूक...

दिग्दर्शक ओम राऊत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आपला नवीन सिनेमा घेऊन येतोय. यावेळी तो बॉलिवूडच्या 'तानाजी - द अनसंग वॉरिअर' नावाचा चित्रपट घेऊन आलाय. याआधी ओमचा मराठी सिनेमा 'लोकमान्य' प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.  

Updated: Jul 20, 2017, 12:57 PM IST
दिग्दर्शक ओम राऊतच्या 'तानाजी'चा फर्स्ट लूक... title=

मुंबई : दिग्दर्शक ओम राऊत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आपला नवीन सिनेमा घेऊन येतोय. यावेळी तो बॉलिवूडच्या 'तानाजी - द अनसंग वॉरिअर' नावाचा चित्रपट घेऊन आलाय. याआधी ओमचा मराठी सिनेमा 'लोकमान्य' प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.  

या चित्रपटा मुख्य भूमिकेत दिसणार आहे अभिनेता अजय देवगण... अजय या सिनेमाचा सहनिर्माताही आहे. आपल्या आगामी सिनेमाबद्दल काही वक्तव्य करणं अजयनं बऱ्याचदा टाळलं. परंतु, गुरुवारी मात्र 'तानाजी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करत अजयनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

'गड आला पण सिंह गेला' म्हणत शिवाजी महाराज आपल्या ज्या सुभेदारासाठी हळहळले त्याच 'सिंहा'वर म्हणजेच तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित हा सिनेमा आहे. हा सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित होईल.