सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाराही याच तुरूंगात

 गॅंगस्टर लॉरेन्स विश्नोई तोच गुन्हेगार आहे, ज्याने ४ जानेवारीला कोर्ट परिसरात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली. 

Updated: Apr 5, 2018, 03:40 PM IST
सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाराही याच तुरूंगात  title=

जोधपुर : काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यासबतच १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. आजच त्याची तुरूंगात रवानगी होणार आहे. पण तुरुंगात जाण हे त्याच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. यामागचं कारणही तसच आहे. गॅंगस्टर लॉरेन्स विश्नोई याआधीच तिथे शिक्षा भोगत आहे.  गॅंगस्टर लॉरेन्स विश्नोई तोच गुन्हेगार आहे, ज्याने ४ जानेवारीला कोर्ट परिसरात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे एकच खळबळ उडाली. आपण एक विद्यार्थी नेता आहोत, आरोप लावणं हे पोलिसांच कामच आहे. पण मी जे करेन ते खुलेआम करेन असे त्याने माध्यमांना सांगितले.  जेव्हा सलमान खान जोधपुरमध्ये येईल तेव्हा आपण त्याला मारु तेव्हाच सर्वांना खर वाटेल अशी धमकी या गॅंगस्टरने दिली. पण या धमकीची परवा न करता सलमान जोधपुरमध्ये पोहोचला. गुरूवारी काळवीट शिकार प्रकरणी सलमानला दोषी ठरवत न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली. 

सलमानसाठी बहिणी रडल्या

सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहिण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते, पण एकूणच सलमान खानला मोठा दिलासा आहे.

इतर सेलिब्रिटी निर्दोष

दरम्यान, सैफअली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आज सकाळी न्यायालयात पोहोचल्यावर सलमान खानने न्यायालयरूममध्ये न्यायाधीशांसमोर उभे राहून निर्दोष असल्याचे म्हटले. आरोपींपैकी सर्वात आधी सलमान खान न्यायालयात पोहोचला होता.

१९९९ साली काळविटाची शिकार

१९९९ साली हम साथ साथ है चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना काळविटाची शिकार करण्यात आली होती.

कैदी नंबर ३४३ 

मागील वेळेस जेव्हा सलमान खानला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा त्याला बरॅक नंबर १ मध्ये ठेवण्यात आले. तेथे सलमान पाच दिवस होता. तेव्हा त्याचा कैदी क्रमांक ३४३ होता.

निकालावेळी सलमान झाला भावूक

खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावूक झाला होता