...म्हणून आई गौरी खानसोबत सुहानाचा फोटो होतोय व्हायरल

 शाहरूख खानची कन्या सुहाना खानही यामध्ये मागे नाही. तिचे फोटो सोशल मीडियात नेहमी चर्चेत असतात. 

Updated: Jul 22, 2018, 03:46 PM IST
...म्हणून आई गौरी खानसोबत सुहानाचा फोटो होतोय व्हायरल title=

मुंबई : सध्या स्टार किड्सची बॉलीवूडमध्ये चलती आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचा धडक सिनेमा चांगली कमाई करतोय. दुसरीकडे साला अली खानच्या 'केदारनाथ'ची रिलीज आधीच चर्चा आहे. शाहरूख खानची कन्या सुहाना खानही यामध्ये मागे नाही. तिचे फोटो सोशल मीडियात नेहमी चर्चेत असतात. नुकतेच तिने आपली आई गौरी खानसोबतच फोटोशूट केलंय. सुहानादेखील मोठ्या पडद्यावर डेब्यू करण्यासाठी उत्सूक आहे.

गौरीसोबत दिसली सुहाना 

 

#gaurikhan #suhanakhanFollow@bollywood_on . . . . . . #aaryankhan #italy #shahrukhkhan #abramkhan #starkids #starwife #family #holidays #familygoals #sweet #pinkvilla #fan #dilwale #kingkhan #actor #srkfan #Fashion #IndianFashion #CelebStyle #InstaFashion #InstaGood #InstaFollow #InstaDaily #LikeForLike #InstaLike #Ootn #ootd #Outfit

A post shared by BollywoodON (@bollywood_on) on

शाहरूख खान आपल्या फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करत होता. याचे खूप सारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शाहरूख आपल्या मोठ्या मुलासोबत घरी परतला पण छोटा अबराम आणि सुहाना न्यूयॉर्कमध्येच थांबले आहेत. काही दिवसांपूर्वीच सुहाना आणि गौरीचा लंच करतानाचा फोटो सोशल मीडियात चर्चेत होता. यानंतर काही तासातच नवा फोटो समोर आलाय. यामध्ये सुहाना आपली मम्मी गौरीसोबत दिसतेय. दोघीही जवळपास सारख्याच दिसतायत. गौरीने सफेद रंगाचा जॅकेट तर सुहानाने सिल्व्हर रंगाचा शिमरी ड्रेस घातलायं.

सुहानाचा डेब्यू 

सुहानादेखील बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. काही आठवड्यांपूर्वीच ती करण जोहरच्या ऑफिसमध्ये दिसली होती. त्यानंतर तिच्या बॉलीवूड डेब्यू चर्चेला सुरूवात झाली. तिची सिनेमात एन्ट्री होईल तेव्हा होईल पण ती लवकरच एका मॅग्झिनध्ये झळकणार आहे.