दुसर्‍या दिवशीही 'गोलमाल अगेन'ने केली दमदार कमाई

'गोलमाल' या धमाल कॉमेडी चित्रपटाचा चौथा सीझन रसिकांच्या भेटीला आला आहे.

Updated: Oct 22, 2017, 04:38 PM IST
दुसर्‍या दिवशीही 'गोलमाल अगेन'ने केली दमदार कमाई  title=

मुंबई : 'गोलमाल' या धमाल कॉमेडी चित्रपटाचा चौथा सीझन रसिकांच्या भेटीला आला आहे.

'गोलमान अगेन' या चित्रपटाने पहिल्या दिवशी  30.14 कोटी कमाई केली. दुसर्‍या दिवशीही या चित्रपटाने बंपर कमाई कायम ठेवली आहे. दुसर्‍या दिवशी २८.२५  कोटी कमवले आहेत. 

बाहुबलीनंतर यंदा बॉक्सऑफिसवर दमदार कमाई करणारा  'गोलमान अगेन' हा चित्रपट ठरला आहे. त्याने एकूण दोन दिवसात ५८.३९ कोटी कमावले आहेत. 
गोलमाल या धमाल कॉमेडी चित्रपटामने पूर्वीच्या तीन सिक्वेलप्रमाणेच चौथ्या भागामध्येही रसिकांना खळखळून  हसवण्यात यश मिळवले आहे. 

रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अजय देवगन सोबत अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल केमू, श्रेयस तळपदे, जॉनी लीवर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, वृजेश हिरजी, तबू आणि परिणीति चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफिसवर या वर्षी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत अजय देवगणने तिन्ही खानांना मागे टाकले  आहे.