गोलमाल अगेन चित्रपटाने चौथ्या दिवशी केली 'इतकी' कमाई!

रोहीत शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' या चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 24, 2017, 05:34 PM IST
गोलमाल अगेन चित्रपटाने चौथ्या दिवशी केली 'इतकी' कमाई! title=

नवी दिल्ली : रोहीत शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' या चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशीच हा चित्रपट सुपरहीट ठरला आणि तिसऱ्या दिवशीच या चित्रपटाने ८७ कोटींहून अधिक कमाई केली. बॉक्स ऑफिसवरील चांगल्या प्रतिसादामुळे या चित्रपट उत्तम कमाई करून १०० कोटीच्या क्लबमध्ये आपले नाव सहभागी करेल, अशी आशा होती. आता चौथ्या दिवसाची कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत. 

तरुण आदर्शने ट्विट करून ही माहिती दिली आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाने १६.०४ कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपटाने स्थान पटकावले आहे. 

गोलमाल अगेन ने पहिल्याच दिवशी बाजी मारत ३०.१४ कोटींचा गल्ला केला. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २८.३७ कोटी कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी २९.०९ इतका गल्ला केला. चौथ्या दिवशी १६.०४ कोटींचा गल्ला झाला. म्हणजेच ४ दिवसात एकूण १०३.६४ कोटींचा बिजनेस चित्रपटाने केला. 

गोलमाल अगेन हा मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या चित्रपटात  अरशद वारसी, तुषार कपूर, कुणाल केमू, श्रेयस तळपदे, जॉनी लीवर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, वृजेश हिरजी, तबू आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.