गोविंदा-कृष्णाच्या नात्याबद्दल सुनीता आहुजा म्हणतात....

या कारणांमुळे गोविंदा-कृष्णाचे नाते संपुष्टात आले आहे. 

Updated: Jun 23, 2018, 11:04 AM IST
गोविंदा-कृष्णाच्या नात्याबद्दल सुनीता आहुजा म्हणतात.... title=

मुंबई : आपल्या परफेक्ट टाइमिंग, कॉमेडी आणि खास डान्स स्टाईलने मोठा पडदा गाजवणारा अभिनेता गोविंदाचा भाचा कृष्णाने तितक्याच ताकदीने छोट्या पडद्यावर कॉमेडीचा तडका लावला. तरीही देखील गोविंदाचा भाचा ही त्याची ओळख कामय राहीली. पण आता काही वैयक्तिक कारणांमुळे गोविंदा-कृष्णाचे नाते संपुष्टात आले आहे. याची माहिती खुद्द गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाने दिली. सुनिता म्हणाल्या की, आता कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीरासोबत असलेले आमच्या कुटुंबाचे संबंध पूर्णपणे संपले आहेत. मी गोविंदा आणि कृष्णामधील अंतर मिटवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. कारण कृष्णाने आपल्या मामासोबत चांगली वर्तवणूक ठेवली नाही.

सुनीता यांनी केला खुलासा

कृष्णाच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसालाच्या पार्टीतही गोविंदा दिसला नाही. यावर सुनीता म्हणाल्या की, त्यावेळेस मी आणि गोविंदा लंडनमध्ये होतो. पण आम्हाला पार्टीचे आमंत्रणही नव्हते आणि असते तरी आम्ही गेलो नसतो. मी त्याच्या मुलांना कृष्णाच्या आणि त्याच्या पत्नीच्या गैरव्यवहारामुळे अजूनही पाहिलेले नाही. आता आम्ही कृष्णा आणि कश्मिरासोबतचे सर्वच नाते संपवले आहे आणि मी शपथ घेते की, आता पुन्हा सर्व सुरळीत करण्याचा मी प्रयत्न करणार नाही. दोन वर्षांपूर्वी मी असा प्रयत्न केला होता आणि मी मुर्ख होते. गोविंदाचे त्याच्याबद्दलचे मत योग्य होते. त्यांना अजून एक संधी देण्याचा विचार मी केला, ही माझी चूक होती. 

माझे प्रेम कोणी बदलू शकत नाही

इकडे कृष्णा म्हणतो की, गोविंदाच्या नावामुळे मला नाव कमावणे सोपे झाले, असे गोविंदाचे म्हणणे आहे. त्याच्या नावाचा मला करिअरमध्ये उपयोग झाला. असे असेल तर मामाचे अजून अनेक भाचे-भाच्या आहेत. हा मी एक गोष्ट मान्य करतो की, तरुणपणात मला व्यक्तिगत स्तरावर मामाने खूप मदत केली आहे. अगदी पैशांचीही मदत केली आहे. पण मी माझे करिअर कठोर मेहनतीने बनवले आहे. आता मला फार वाईट वाटत आहे. कारण मी मामावर नेहमीच प्रेम केले आहे. त्यांचा सन्मान केला आहे. मी त्यांच्या घरी ६ वर्ष राहिलो आहे आणि सुनीता मामीने मला त्यांच्या मुलासारखे प्रेम दिले आहे. मला माहित आहे की, ते माझ्यासाठी काय आहे आणि ते कोणी बदलू शकत नाही.