लाडक्या 'थलैवा'ला चाहत्यांनी दिल्या अशा शुभेच्छा...

सगळ्यांचा लाडका 'थलैवा' म्हणजे रजनीकांतचा आज ६७ वा वाढदिवस... त्याच्या वाढदिवसाचं आगळं सेलिब्रेशनच चेन्नईच्या एका मॉलमध्ये करण्यात आलं. 

Updated: Dec 12, 2017, 11:45 PM IST
लाडक्या 'थलैवा'ला चाहत्यांनी दिल्या अशा शुभेच्छा...  title=

मुंबई : सगळ्यांचा लाडका 'थलैवा' म्हणजे रजनीकांतचा आज ६७ वा वाढदिवस... त्याच्या वाढदिवसाचं आगळं सेलिब्रेशनच चेन्नईच्या एका मॉलमध्ये करण्यात आलं. 

छोट्या आकाराच्या ६ हजार ७०० कप-केकचा वापर करून रजनीकांतचं चित्र साकारण्यात आलं होतं. या केकची किंमत अंदाजे दोन लाख रुपयांच्या आसपास आहे. 

आपला ट्रेडमार्क गॉगल लावलेल्या 'थलैवा'चं हे गोड चित्र पाहण्यासाठी त्याच्या शेकडो चाहत्यांनी गर्दी केली होती.