दाऊदच्या बहिणीच्या जीवनावर आधारीत 'हसीना पारकर'चा टीझर रिलीज

Last Updated: Monday, June 19, 2017 - 17:10

मुंबई : श्रद्धा कपूरने आपला आगामी चित्रपट 'हसीना पारकर'चा टीझर रिलीज केला आहे. श्रद्धा कपूरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट अपूर्व लाखियाने दिग्दर्शित केला आहे. श्रद्धा कपूरने आज फेसबुक लाईव्हद्वारे तिच्या सह कलाकार अंकुर भाटीया याच्याबरोबर चित्रपटाचा टीझर रिलीज केला. हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या जीवनावर आधारित आहे.

या चित्रपटात श्रद्धा कपूर दाऊदची बहीण हसीना पारकरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात हसीनाची कन्या, आई आणि नंतर गॉडमदर अशी संपूर्ण कथा दाखवली आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरसुद्धा बॉलीवुडमध्ये एंट्री करणार आहे. हसीना पारकरमध्ये सिद्धांत कपूर हा हसीनाचा भाऊ दाऊद इब्राहिमची भूमिका केली आहे.

First Published: Monday, June 19, 2017 - 17:10
comments powered by Disqus