हेजल कीच बद्दल पसरतेय ही अफवा ...

हेजल कीच आणि युवराज सिंगचे काही फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.

Updated: Sep 14, 2017, 06:20 PM IST
हेजल कीच बद्दल पसरतेय ही अफवा ...

मुंबई : हेजल कीच आणि युवराज सिंगचे काही फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.

या फोटोंसोबतच हेजल आणि युवराजराजच्या घरी नवा पाहुणा येणार ? अशा अफवा  पसरत आहे. पण खुद्द हेजलनेच या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचा खुलासा केला आहे. 

मी माझ्या कामामुळे सतत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फिरत आहे. तसेच युवराजही सध्या कामात व्यस्त आहे. अशी माहिती हेजलने दिली आहे. त्यामुळे सध्या आम्ही बाळाचा विचार करत नसल्याचेर तसेच मी गरोदर नसल्यची माहिती हेजलने दिली आहे.  तसेच आम्ही आमचं लग्न एन्जॉय करत आहोत. ज्या वेळेस आम्ही आई- बाबा होण्याचा निर्णय घेऊ तेव्हा तो सहाजिकच सार्‍यांना कळेल. आतापासूनच तुम्ही तर्क वितर्क काढू नका. अशी माहितीही हेजलने दिली आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हेजल आणि युवराज विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नाला काही दिवसात वर्ष पूर्ण होईल. त्यामुळे इतर सामान्य कपल्सप्रमाणे युवराज- हेजलदेखील बाळाचा विचार कधी करणार ? याबाबत सतत विचारणा केली जाते.