भारतातील सर्वात महागड्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित...

भारतातील सर्वात महागड्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 12, 2017, 09:01 PM IST
भारतातील सर्वात महागड्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित...
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : भारतातील सर्वात महागड्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. '२.०' या चित्रपटासाठी तब्बल ४०० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या चित्रपटाचं शूटींग थ्री डी असल्यामुळे त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 

दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत, अॅमी जॅक्सन हे प्रमुख भुमिकेत असून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार खलनायाकच्या भुमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर व अभिनेत्री अॅमी जॅक्सन यांनी हे पोस्टर ट्विटरवरून शेअर केलं आहे. त्यात  अॅमी एलियनच्या रूपात असून 'जग फक्त मानवजातीसाठी नाही,' असं त्या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. 

'२.०' साठी ४०० कोटींचं बजेट निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यापैकी निर्मिती आणि मार्केटिंगवर आतापर्यंत १५० कोटी रुपये खर्च झाले आहेत.  या चित्रपटाचं शूटींग थेट थ्री डी करण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट खास असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे.