हिना खानच्या नव्या गाण्याचा टीझर आऊट

टीव्ही दुनियेतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या लोकप्रियतेत बीग बॉसनंतर प्रचंड वाढ झाली आहे.

Updated: Jul 13, 2018, 07:51 AM IST
हिना खानच्या नव्या गाण्याचा टीझर आऊट

मुंबई : टीव्ही दुनियेतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या लोकप्रियतेत बीग बॉसनंतर प्रचंड वाढ झाली आहे. ये रिश्ता क्या कहेलाता है मधील अक्षराने तिने देशातील घराघरात पोहचवले आणि लोकप्रिय केले. हिना खान सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावरून ती चाहत्यांना स्वतः बद्दलचे अपडेट्स देत असते. आता हिना चाहत्यांसाठी एक छान सरप्राईज घेऊन आली आहे.

हिना खानने इंस्टग्रामवर एक नवा म्युझिक व्हि़डिओचा टीझर शेअर केला. हा टीझर शेअर करताना तिने लिहिले, हा आहे #Bhasoodi चा टीझर, हे गाणे आजपासून पाच दिवसांनी लॉन्च होईल.

पहा टीझर...

हिनाचा बोल्ड अंदाज

टीझरमध्ये हिनाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. यात हिना शॉर्ट्स आणि डेनिम जॅकेटमध्ये दिसते. या लूकमध्ये ती अतिशय बोल्ड आणि सिजलिंग दिसत आहे.

हिनाच्या गाण्याचे सलमानलाही कौतुक

या म्युझिक व्हिडिओमध्ये हिनाने स्वतःचा आवाज दिला आहे. यापूर्वीही बिग बॉसच्या घरात आपण हिनाला गाताना ऐकले आहे. बिग बॉसमधील हिनाच्या गाण्याचा चक्क सलमान खानही फॅन झाला होता. त्याने अनेकदा गाण्यासाठी तिचे कौतूकही केले होते.

गाण्याबद्दल...

या म्युझिक व्हिडिओत सोनू ठकुरालने आवाज दिला असून प्रीत हुंडईने हे संगीतबद्ध केले आहे. तर रॉबी सिंगने हा व्हिडिओ दिग्दर्शित केला आहे. गाण्याचे शूटिंग पंजाबच्या पटियालात करण्यात आले आहे.