'राम तेरी गंगा मैली'ची मंदाकिनी आता कशी दिसते?

1985 मध्ये रिलीज झालेला चित्रपट, राम तेरी गंगा मैलीमधून एका रात्रीत प्रसिद्ध झालेली राज कपूर यांनी शोधलेली मंदाकिनी आता कधी दिसते हे पाहण्यासाठी अनेक जण उत्सूक असतील.

Updated: Nov 18, 2017, 12:09 PM IST
'राम तेरी गंगा मैली'ची मंदाकिनी आता कशी दिसते? title=

मुंबई : 1985 मध्ये रिलीज झालेला चित्रपट, राम तेरी गंगा मैलीमधून एका रात्रीत प्रसिद्ध झालेली राज कपूर यांनी शोधलेली मंदाकिनी आता कधी दिसते हे पाहण्यासाठी अनेक जण उत्सूक असतील.

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री

मंदाकिनी बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. पण अचानक ती या सिनेसृष्टीतून गायब झाली आणि चर्चा रंगू लागल्या १९९४ मधील मुंबई स्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत मंदाकिनीचं नाव जोडलं जाऊ लागल्यानंतर ती अचानक गायब झाली. १९९६ मध्ये शेवटचा चित्रपट जोरदार रिलीज झाला पण त्यानंतर मंदाकिनी कुठे गेली हे कोणालाच कळालं नाही. मंदाकिनीने दाऊदसोबतचे संबंध नाकारले होते पण शारजा क्रिकेट स्टेडिअममध्ये मंदाकिनी दाऊद सोबत सामना पाहतांना दिसली होती.

Related image

दाऊद आणि मंदाकिनीमध्ये प्रेमसंबंध

१९९० च्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, दाऊद आणि मंदाकिनीमध्ये प्रेमसंबंध होते. बॉलिवूडची अभिनेत्री मंदाकिनी दाऊदला इतकी आवडली होती की तो तिच्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा दिसत होता. मंदाकिनी देखील त्याला भेटण्यासाठी दुबईला जायची. त्या काळात, मंदाकिनी डॉनच्या प्रत्येक पार्टीत सहभागी होत होती. दाऊदसोबत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात ती दिसायची.

Related image

बौद्ध संत कागीर रिनपोचे सोबत लग्न

३० जुलै १९६९ मध्ये जन्मलेल्या मंदाकिनीचे खरे नाव यस्मीन जोसेफ होते. तिची आई मुस्लीम आणि वडील ख्रिश्चन होते. मंदाकिनीला लहानपणापासून अभिनयात रस होता, वयाच्या 16 व्या वर्षी तिला पहिला ब्रेक मिळाला. बॉलिवूडमधील मंदाकिनीची कारकीर्द लहान आणि वादग्रस्त आहे. १९९५ मध्ये तिने बौद्ध संत कागीर रिनपोचे सोबत लग्न केले आणि सध्या ती मुंबईत तिबेटी हर्बल सेंटर चालवत आहे. तसेच मंदाकिनी लोकांना तिबेटी योगा शिकवते. मंदाकिनीने आता बौद्ध धर्म स्वीकारला आहे.

Related image

मंदाकिनीने स्वत:ला चमकदार जगापासून वेगळे केले आहे. मंदाकिनीची दोन मुले होती. पुत्र रब्बील आणि मुलगी राब्जे. २००० मध्ये मुलाचा एका अपघातात मृत्यू झाला होता.