आयकर विभागानं सील केली शाहरुखची 'बेनामी' संपत्ती

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचं अलिबागचं फार्महाऊस आयकर विभागाकडून सील करण्यात आलंय. 

Updated: Jan 31, 2018, 11:22 AM IST
आयकर विभागानं सील केली शाहरुखची 'बेनामी' संपत्ती  title=

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचं अलिबागचं फार्महाऊस आयकर विभागाकडून सील करण्यात आलंय. 

शाहरुखला अलिबागमध्ये बंगला बनवण्याच्या नादात पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकावं लागलंय. 

अधिक वाचा : एक असाही मुख्यमंत्री ज्यांनी आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलंच नाही...

हा बंगला बनवण्यासाठी शाहरुखनं नियमांचं उल्लंघन करत कागदांसोबत छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आता आयकर विभागानं त्याचं हेच फार्महाऊस सील करून त्याला टाळं ठोकलंय. 

शाहरुख हे फार्महाऊस बेनामी संपत्ती घेवाण-देवाणी अधिनियमांतर्गत अडकलाय. शाहरुखनं अलिबागमध्ये शेतीसाठी जमीन खरेदी केली होती. परंतु, त्याऐवजी त्यानं एक मोठ्ठं फार्महाऊस उभारलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखला ९० दिवसांची वेळ देत 'कारणे दाखवा' नोटीस देण्यात आलीय. 

अधिक वाचा : बँकेत रक्कम जमा करणाऱ्यांसाठी खुशखबर!