इरफान खान लवकरच सिल्वर स्क्रीनवर करणार एन्ट्री

चाहत्यांसाठी मोठी बातमी 

इरफान खान लवकरच सिल्वर स्क्रीनवर करणार एन्ट्री  title=

मुंबई : आपल्या अभिनयातून लोकांच मन जिंकणाऱ्या आणि नॅशनल अवॉर्ड विजेता इरफान खान गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी दोन हात करत आहे. त्याच्या या आजारपणाची माहिती ऐकताच सगळ्यांना त्रास झाला. इरफान खान या आजारामुळे शारीरिक आणि मेंटल ट्रॉमामधून गेला आहे. इरफानच्या फॅन्सनी असा विचार केला होता की, आता आपल्या आवडत्या कलाकाराला पुन्हा आपण स्क्रिनवर पाहू शकणार नाही. 

कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी इरफान लंडनमध्ये आहे. या आजारपणामुळे इरफान खानचे दोन प्रोजेक्ट हातातून गेले आहेत. यामध्ये विशाल भारद्वाजचा एक सिनेमा आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोणला साइन केलं आहे. तर दुसरा प्रोजेक्ट पॉलिटिकल वेब सिरीजचा 'गोरमिंट'अशी होती. पण आता इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. ती म्हणजे इरफान खान 'हिन्दी मीडियम' या सिनेमाच्या सिक्वलमध्ये काम करताना आपल्याला लवकरच दिसणार आहे. 

इरफान खानच्या तब्बेतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे तो लवकरच सिल्वर स्क्रिनवर वापसी करत आहे. हिन्दी मीडियम 2 हा सिनेमा इरफानने साईन केला आहे. याची घोषणा 2018 फेब्रुवारीमध्ये केली आहे. याचं दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केलं आहे. या सिनेमाच्या घोषणेनंतर इरफान आजारी पडला. आणि हा प्रोजेक्ट लांबणीवर पोहोचला.