अभिनेत्री रिया सेन लग्नाआधीच प्रेग्नेंट?

अभिनेत्री रिया सेन हीचं अगदी धावपळीत बुधवारी पुण्यात लग्न झाल्याची बातमी समोर आली. साऱ्यांनी रिया सेन आणि तिचा नवरा शिवम याला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. पण आता आलेल्या माहितीनुसार, रिया सेन प्रेग्नेंट असल्यामुळे अशा धावपळीत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केल्याची बाब समोर आली आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 18, 2017, 02:49 PM IST
अभिनेत्री रिया सेन लग्नाआधीच प्रेग्नेंट?  title=

मुंबई : अभिनेत्री रिया सेन हीचं अगदी धावपळीत बुधवारी पुण्यात लग्न झाल्याची बातमी समोर आली. साऱ्यांनी रिया सेन आणि तिचा नवरा शिवम याला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. पण आता आलेल्या माहितीनुसार, रिया सेन प्रेग्नेंट असल्यामुळे अशा धावपळीत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केल्याची बाब समोर आली आहे. 

अभिनेत्री मुनमुन सेन हिची मुलगी रिया सेन विवाहबंधनात अडकणार, अशी चर्चा गेल्या चार दिवसांपूर्वी कानावर आली आणि त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत रिया सेन लग्नबंधनात अडकली सुद्धा. बॉयफ्रेन्ड शिवम तिवारी याच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली.  पण या सोहळ्यानंतर एका बातमीलाही तोंड फुटले. लग्नाआधी प्रेग्नेंट असल्यामुळे रियाचे लग्न असे घाईघाईत उरकण्यात आल्याची चर्चा आहे. अर्थात या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.  पण ही चर्चो जोरदार रंगली आहे. 

रिया सेन हिने शिवम आपल्या बॉयफ्रेंडशी लग्न केलं आहे. शिवम फोटोग्राफीच्या क्षेत्रात आहे.  विविध ठिकाणी भटकंती करण्याचीही त्याला आवड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिया शिवमला डेट करतेय. रियाच्या स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते.  

रिया सेन आता एकता कपूरच्या रागिणी MMS 2.2 या वेबसिरीजचं शुटिंग करत होती. तिने  १९९१ मध्ये ‘विषकन्या’ या चित्रपटात रिया सेन बालकलाकार म्हणून दिसली होती. २००१ मध्ये आलेल्या ‘स्टाईल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. हा चित्रपट एक सेक्स कॉमिडी चित्रपट होता. अर्थात रियाचे बॉलिवूड करिअर फार यशस्वी नव्हतेच. काही बंगाली व मल्याळम सिनेमही तिने केले.  फाल्गुनी पाठकच्या आवाजातील ‘याद पिया की आने लगी; या गाण्याने रियाला खरी ओळख दिली. त्यावेळी रिया केवळ १६ वर्षांची होती. २००५ मध्ये रियाचा एक एमएमएस आला होता. या एमएमएसने चांगलीच खळबळ माजली होती. यात ती अभिनेता अश्मित पटेलसोबत दिसली होती.