ड्रग्ज प्रकरणात या अभिनेत्रीची कसून चौकशी!

 ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अभिनेत्री तथा आयटम गर्ल मुमैथ खान हिची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 29, 2017, 09:55 PM IST
ड्रग्ज प्रकरणात या अभिनेत्रीची कसून चौकशी! title=

हैदराबाद :  ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अभिनेत्री तथा आयटम गर्ल मुमैथ खान हिची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली.

तेलंगणाच्या अबकारी विभाग आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) तिची चौकशी केली. एसआयटी विभागाच्या चार सदस्यीय अधिकाऱ्यांनी मुमैथला अबकारी विभागाच्या कार्यालयात बोलाविले होते. 

मुमैथचे ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या केल्विन मास्करेनहास याच्यासोबत संबंध असल्याचा एसआयटीला संशय आहे. सध्या मुमैथ 'बिग बॉस' या तेलगू रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. 

एसआयटीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी ती मुंबई येथून हैदराबादला पोहोचली. तेलगू फिल्म इंडस्ट्रीमधील मुमैथ आठवी अशी सेलिब्रिटी आहे, तिला ड्रग्ज प्रकरणात एसआयटीसमोर हजर व्हावे लागले आहे.