जॅकलिनने मेकअप आर्टिस्टला दिली महागडी कार गिफ्ट...

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आपल्या टीमला नेहमी खूश ठेवते.

Updated: Apr 18, 2018, 10:21 PM IST
जॅकलिनने मेकअप आर्टिस्टला दिली महागडी कार गिफ्ट... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आपल्या टीमला नेहमी खूश ठेवते. आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांना ती कुटुंबाप्रमाणे वागणूक देते. याचाच प्रयत्य देणारी एक घटना समोर आली आहे. अलिकडेच वाढदिवसानिमित्त जॅकलिनने तिच्या मेकअप आर्टिस्टला नवीकोरी गाडी गिफ्ट दिली. 

व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

गेल्या काही वर्षांपासून जॅकलिन शान मुत्ताथिलसोबत काम करत आहे. शानच्या ३४ वाढदिवसानिमित्त जॅकलिनने एक महागडी गाडी गिफ्ट केली. या गोष्टीची माहिती शानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन दिली आहे. यात त्याने जॅकलिनचे आभार मानले आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना शानने लिहिले की, काही अशाप्रकारे माझ्या वाढदिवसाची सुरूवात झाली. जॅकलिनने खरंच मला सरप्राईज दिली. जेव्हा तू मला माझ्या कारपर्यंत जाताना व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितलास तेव्हा मला कल्पनाच नव्हती की माझ्यासाठी काय सरप्राईज वाट पाहत आहे.

 

Thanks to everyone for your amazing birthday wishes. This is how my birthday day started, like always a working birthday and this year @jacquelinef143 u really surprised me ... when u told me to record u walking down to ur car for ur own @justf143 launch I had no clue what an amazing plan you had for me ..... guys watch the full video how jacksy surprised me on my #birthday ..... #grateful

A post shared by Shaan Muttathil (@shaanmu) on

हा फक्त मेकअप आर्टिस्ट नाही तर...

जॅकलिन शानला फक्त मेकअप आर्टिस्ट नाही तर खूप चांगला मित्र मानते. सुत्रांनुसार, शानला गाडी गिफ्ट करण्यासाठी तिने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची मदत घेतली. माहितीनुसार, या गाडीची किंमत २० लाख रुपये आहे.