'येथे' रंगणार सोनम कपूरचा विवाहसोहळा...

 २०१७ हे वर्ष बॉलिवूडसाठी लग्नमय ठरले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 26, 2017, 10:10 AM IST
'येथे' रंगणार सोनम कपूरचा विवाहसोहळा... title=

मुंबई : २०१७ हे वर्ष बॉलिवूडसाठी लग्नमय ठरले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सागरिका घाटगे- झहीर खान, अनुष्का शर्मा- विराट कोहली ही जोडपी लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाची चर्चा ताजी असताना नवीन वर्षात अजून एक प्रसिद्ध अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. ती म्हणजे सोनम कपूर.

कुठे होणार विवाहसोहळा ?

प्रसिद्ध व्यावसायिक आनंद आहुजा आणि सोनम कपूर गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नवीन वर्षात हे दोघे लग्न करणार असून विवाहस्थळ देखील ठरल्याचे समजते आहे. जोधपूर येथे हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. विवाहस्थळाची बुकींगही झाल्याचे समजतेय. 

बॉलिवूडमध्ये रंगल्या प्रेमाच्या चर्चा

काही दिवसांपूर्वी सोनम आणि आहूजा यांनी लंडनमध्ये एकत्र सुट्टी घालविली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये दोघांच्या प्रेमाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. इतकंच नाही तर सोनम कपूरने आपल्या एका जवळच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी बहिण रिया कपूरसोबत लंडनमध्ये गेली होती. त्यावेळीही सोनम आणि आनंद एकत्र दिसले.