कंगनाची बहिण होणार आई, एकतर्फ़ी प्रेमातून झाला होता तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला

अभिनेत्री कंगना राणावत तिच्या कलाकारांवरील आरोपांमुळे सध्या चांगलीच चर्चेत आलेली आहे. आदित्य पांचोली आणि त्याच्या पत्नीकडून कंगनावर पलटवार होत असताना, कंगनाला तिची बहिण रंगोलीची साथ मिळत आहे.

Updated: Sep 13, 2017, 04:17 PM IST
कंगनाची बहिण होणार आई, एकतर्फ़ी प्रेमातून झाला होता तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत तिच्या कलाकारांवरील आरोपांमुळे सध्या चांगलीच चर्चेत आलेली आहे. आदित्य पांचोली आणि त्याच्या पत्नीकडून कंगनावर पलटवार होत असताना, कंगनाला तिची बहिण रंगोलीची साथ मिळत आहे.

त्यामुळे तिच्यासोबतच तिची बहिण रंगोली चंदेल ही सुद्धा चर्चेत आली आहे. रंगोली कंगनाची बाजू घेण्यासोबतच आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. रंगोली ही प्रेग्नंट आहे. 

रंगोलीने नुकताच एक फोटो शेअर केला असून त्यात ती बेबी बंप दाखवताना दिसत आहे. रंगोली याआधीही एकदा चर्चेत आली होती. रंगोली ही अ‍ॅसिड व्हिक्टीम आहे. एका माथेफिरूने एकतर्फ़ी प्रेमातून तिच्यावर अ‍ॅसिड फेकलं होतं. याचा उल्लेख अनेकदा कंगनाने तिच्या मुलाखतींमध्ये केला आहे. कंगना एका म्युझिक लॉन्च इव्हेंटमध्येही रंगोलीच्या प्रेग्नन्सीचा उल्लेख केला होता. 

काही दिवसांपूर्वीच रंगोली बहिण कंगना राणावतच्या आगामी ‘सिमरन’ सिनेमाच्या म्युझिक लॉन्च इव्हेंटला आली होती. या इव्हेंटमध्ये ती प्रेग्नेंट असल्याचे समोर आले होते. त्यानंतर कंगनाने याला दुजोरा दिला होता. 

रंगोलीनी २०११ मध्ये दिल्लीचा उद्योगपती अजय चंदेल याच्याशी लग्न केले होते. रंगोली ही कंगनाची मॅनेजर सुद्धा आहे. ती कंगनाचे सगळे प्रोफेशनल कामं सांभाळते. आता कंगनाने एक टीम हायर केली आहे. जेणेकरून तिच्या बहिणीला आराम मिळेल.