VIDEO : सुनीलशी फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणावर कपिल शर्माने उडवली खिल्ली

 कॉमेडियन सुनील ग्रोवर यांच्यासोबत फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणाला आता खूप दिवस झाले, पण हा वाद कपिल शर्मा अजून विसरलेला दिसत नाही. आता या दुःखाला विसरण्यासाठी कपिल शर्मा या वादाची खिल्ली उडवत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 29, 2017, 07:08 PM IST
 VIDEO : सुनीलशी फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणावर कपिल शर्माने उडवली खिल्ली  title=

नवी दिल्ली :  कॉमेडियन सुनील ग्रोवर यांच्यासोबत फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणाला आता खूप दिवस झाले, पण हा वाद कपिल शर्मा अजून विसरलेला दिसत नाही. आता या दुःखाला विसरण्यासाठी कपिल शर्मा या वादाची खिल्ली उडवत आहे. 

सुनील ग्रोवरशी झालेल्या वादानंतर कपिलच्या शोमधून सुनील ग्रोवरसह अली असगर, चंदन प्रभाकर आणि सुगंधा मिश्रा यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कपिलच्या शोचा टीआरपी जबरदस्त घसरला होता. नवे कलाकार घेऊन फायदा झाला नाही. 

नुकत्याच एका एपिसोडमध्ये कपिलने सुनीलशी झालेल्या भांडणाला पुन्हा हवा दिली आणि त्यान फ्लाइटच्या घटनेवर खिल्ली उडविणारा एक जोक तयार केला. 

शोमध्ये कपिल एका ट्रॅव्हल एजन्सीचा मालक बनला आहे. इतर कलाकार एका नकली प्लेनमध्ये बसून अॅक्ट करत आहे. यात सर्व प्रवासी एकमेकांशी लढत होते. त्यावेळी एअरहोस्टेस बनलेला किकू शारदा कपिलला म्हटला तुम्ही काही बोलत नाही. त्यावर कपिल म्हणतो आज काल मी फ्लाइटमध्ये काहीच बोलत नाही. या जोक सर्वांनी सुनील आणि कपिलच्या भांडणाशी जोडला आणि एकच हास्यकल्लोळ झाला. 

या एपिसोडमध्ये भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या, शिखर धवन आणि सुरेश रैना आले होते.