'द कपिल शर्मा शो' पुन्हा सुरु होणार!

कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

Updated: Sep 14, 2017, 09:30 PM IST
'द कपिल शर्मा शो' पुन्हा सुरु होणार!

मुंबई : कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून कपिलचा शो सुरू होईल, अशी बातमी इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमनं प्रसिद्ध केली आहे.

कपिल शर्माची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाल्यामुळे शोमधून ब्रेक घेण्याचा निर्णय कपिलनं घेतला होता. कपिलची तब्येत ठीक झाल्यावर पुन्हा एकदा शो सुरू करू अशी प्रतिक्रिया सोनी इंटरटेंनमेंटनं दिली होती. आता पुन्हा एकदा कपिल शर्मा त्याच्या चाहत्यांना हसवायला सज्ज झाला आहे.