'फॅमिली टाइम विद कपिल' शो द्वारा कपिल शर्मा करणार टेलिव्हिजनवर पुनरागमन

आजारपण आणि सहकलाकारांच्या वादानंतर कपिल शर्माचा कॉमेडी शो बंद करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा नव्या दमाने कपिल शर्मा टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Updated: Mar 8, 2018, 03:07 PM IST
'फॅमिली टाइम विद कपिल' शो द्वारा कपिल शर्मा करणार टेलिव्हिजनवर पुनरागमन

मुंबई : आजारपण आणि सहकलाकारांच्या वादानंतर कपिल शर्माचा कॉमेडी शो बंद करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा नव्या दमाने कपिल शर्मा टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

'फ़ॅमिली टाईम विद कपिल' शर्मा लवकरच 

कपिल शर्मा 25 मार्चपासून पुन्हा टेलिव्हिजनवर येणार आहे. 'फॅमिली टाईम विद कपिल' हा कॉमेडी शो पुन्हा प्रेक्षकांना हसावायला सज्ज झाला आहे. हा कपिल शर्माचा तिसरा कॉमेडी शो आहे. 

हटके शो 

कपिल शर्माच्या मागील दोन शोपेक्षा हा कार्यक्रम हटके असणार आहे. कपिल शर्माच्या या शोमध्ये कॉमन / सामान्य व्यक्तींचाही समावेश करण्यात येणार आहे. 
सामान्य व्यक्ती या शोमध्ये परिवारासह सहभाग घेऊ शकणार आहेत. 

 

कलाकार कोण ? 

ऑस्ट्रेलियाहून परतताना कपिल शर्मासोबत अभिनेता  सुनील ग्रोव्हर यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यानंतर सुनील कपिलच्या शोमधून बाहेर पडला. मात्र आता सुनील ग्रोव्हर कपिलच्या नव्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही. इतर टीम कपिलसोबत राहणार आहे. 

नव्या ढंगातील कपिल शर्मा शोमध्ये मराठी कलाकार विशाखा सुभेदार आणि अन्य मराठी कलाकारदेखील दिसण्याची शक्यता आहे.