नाव न घेता करणाचा कंगनाला सल्ला...

कंगना रणावतने टीव्हीवर एका शो मध्ये दिलेल्या मुलाखतीनंतर बॉलिवूड वर्तुळात ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीत तिने हृतिक रोशन, आदित्य पांचोली, अध्ययन सुमन, करण जोहर याच्याबद्दल बेधडक व्यक्तवे केली. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 13, 2017, 03:51 PM IST
नाव न घेता करणाचा कंगनाला सल्ला...
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : कंगना रणावतने टीव्हीवर एका शो मध्ये दिलेल्या मुलाखतीनंतर बॉलिवूड वर्तुळात ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीत तिने हृतिक रोशन, आदित्य पांचोली, अध्ययन सुमन, करण जोहर याच्याबद्दल बेधडक व्यक्तवे केली. 

 नुकताच  एआईबी या युट्यूब चॅनलसाठी तिने एक व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये सहसा उल्लेख न केले जाणारे शब्द अगदी सहज वापरले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिग्दर्शक कारण जोहरने तिला ट्विटरवरून एक सल्ला दिला आहे. 

 या ट्विटमध्ये कंगनाचं नाव न घेता त्याने लिहिलं की, ‘डिअर टॅलेंट, तू अतिआत्मविश्वास आणि भ्रम या गोष्टींपासून दूर राहावं असं मला वाटतं. या गोष्टी सातत्याने तुझ्याविरोधात कट रचत आहेत. हे तुला दिसत नाही का?’

‘द बॉलिवूड दीवा’ या कंगनाच्या व्हिडिओमध्ये ‘चिटियाँ कलाईयाँ’ या गाण्याची चाल वापरून नवे शब्द लिहिले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीतील काही कटू सत्य मांडण्यात आली आहेत. करणच्या ‘कभी खुशी कभी गम’ या गाण्याची पार्श्वभूमीदेखील यात वापरण्यात आली. बॉलिवूडमध्ये ठराविक लोकांचं असलेलं वर्चस्व, महिलांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक यांसारख्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.  त्याचबरोबर करण आणि हृतिकलाही टोला लगावण्यात आला आहे. म्हणूनच करणने ट्विटरच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे कंगनाला अतिआत्मविश्वासापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. यावर कंगना काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल