'या' फोटोमुळे सोशलमीडियात ट्रोल होतेय करिना कपूर

'टशन' चित्रपटाच्या वेळेस अभिनेत्री करिना कपूर 'झिरो साईज फिगर'मुळे चर्चेत आली होती.

Updated: Mar 26, 2018, 09:03 PM IST
'या' फोटोमुळे सोशलमीडियात ट्रोल होतेय करिना कपूर  title=

सिंगापूर : 'टशन' चित्रपटाच्या वेळेस अभिनेत्री करिना कपूर 'झिरो साईज फिगर'मुळे चर्चेत आली होती. गरोदरपणानंतर पुन्हा करिना कामांमध्ये व्यस्त झाली आहे. नुकतीच सिंगापूरमध्ये मनीष मल्होत्राच्या समर कलेक्शनसाठी करिना रॅम्पवर उतरली होती. मात्र या कार्यक्रमातील करिनाचा 'अवतार' पाहून अनेकांनी सोशलमीडीयावर तिला ट्रोल केलं आहे.  

का झाली करिना कपूर ट्रोल? 

अभिनेत्री करिना कपूर ट्रोल होण्यामागील कारण म्हणजे तिची देहयष्टी. करिना कपूर सोशलमीडीयावर अ‍ॅक्टीव्ह नाही. मात्र अभिनेत्री अमृता अरोरा या तिच्या बॉलिवूडमधील जवळच्या मैत्रिणीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केल्यानंतर करिनाला अनेकांनी ट्रोल केलं आहे. 

 

 

My muse for ever #kareenakapoorkhan #love  @mmalhotraworld #MMLXSingapore

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05) on

काय म्हणाले नेटकरी ? 

मनीष मल्होत्राच्या समर कलेक्शनसाठी करिना कपूरने खास ड्रेस परिधान केला होता. मात्र करिना फोटोमध्ये अत्यंत बारीक दिसत असल्याने अनेकांनी तिला पुरेसे खाण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच अनेकांनी 'तुझ्यामुळे भारत कुपोषित असल्यासारखे वाटत आहे.' असेही सुनावले. 

कार्तिक आयर्नसोबत करिना कपूर 

मनीष मल्होत्राच्या समर कलेक्शनसाठी करिना कपूरसोबत 'सोनू की टीटू की स्वीटी' मधून प्रकाशझोकात आलेला कार्तिक आर्यन हा अभिनेता शो स्टॉपर म्हणून झळकला. कार्तिक आर्यनने काळी शेरवानी परिधान केली होती. लवकरच करिना कपूर वीरे दी वेडिंग या चित्रपटातून पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे.