...म्हणून करिनाचा 'वीरे दी वेडिंग' हा चित्रपट १ जूनला प्रदर्शित होणार!

 प्रेग्नंसीच्या ब्रेकनंतर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून करिना कपूर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 13, 2018, 03:49 PM IST
...म्हणून करिनाचा 'वीरे दी वेडिंग' हा चित्रपट १ जूनला प्रदर्शित होणार!

मुंबई : प्रेग्नंसीच्या ब्रेकनंतर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून करिना कपूर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात करिना कपूर खान सोबतच सोनम कपूर, शिखा तलसानिया आणि स्वरा भास्कर या अभिनेत्री आहेत. हा चित्रपट १८ मे ला प्रदर्शित होणार होता. मात्र याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सोनमने ट्विटरच्या माध्यमातून तारीख पुढे ढकल्याचे सांगितले आणि नवीन रिलीज डेटही जाहीर केली.

सोनमने दिली माहिती

सोनमने ट्वीटमध्ये लिहीले की, या मौसममधील सर्वात मोठ्या लग्नासाठी तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे. १ जून ‘वीरे दी वेडिंग’साठी राखीव ठेवा. निर्माती एकता कपूरने सांगितले की, हा चित्रपट तिच्या भाच्याच्या म्हणजेच लक्ष्यच्या वाढदिवसाला प्रदर्शित करण्यात येईल.

१ जून हा सर्वात मोठा दिवस

लक्ष्य हा अभिनेता तुषार कपूरचा मुलगा आहे. जून २०१६ मध्ये आयव्हीएफ आणि सरोगसीच्या माध्यमातून त्याचा जन्म झाला. एकताने सांगितले की, १ जून हा सर्वात मोठा दिवस आहे. ‘वीरे दी वेडिंग’लक्ष्यच्या वाढदिवसाला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या्मुळे वाढदिवस आणि लग्न यासाठी तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे.

 

हे आहेत चित्रपटाचे निर्माते

हास्य आणि रोमान्सने भरलेल्या या चित्रपटाची सह-निर्माती सोनम कपूरची बहीण रिया कपूर, एकता कपूर आणि निखिल द्विवेदी आहे.