अन् जेव्हा कतरिना कैफ गल्ली क्रिकेट खेळते.........

'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या अंतिम टप्प्यातील चित्रीकरणासाठी सध्या कतरिना कैफ आणि सलमान खान युएईमध्ये आहे. पण शुटिंगच्या दरम्यानच्या वेळात कतरिना नेमकी काय करते ? याबाबातचा एक खास व्हिडिओ नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Updated: Sep 1, 2017, 06:58 PM IST
अन् जेव्हा कतरिना कैफ गल्ली क्रिकेट खेळते.........  title=

मुंबई : 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या अंतिम टप्प्यातील चित्रीकरणासाठी सध्या कतरिना कैफ आणि सलमान खान युएईमध्ये आहे. पण शुटिंगच्या दरम्यानच्या वेळात कतरिना नेमकी काय करते ? याबाबातचा एक खास व्हिडिओ नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

कतरिना तिच्या टीम मेंबर्ससोबत गल्ली क्रिकेट खेळताना दिसली. यावेळेस तिच्यासोबत अंगद बेदी होता. इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना ती बॉलिंग करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर तिने Some really unfortunate bowling असे कॅप्शन दिले होते. 

कतरिना क्रिकेट या खेळात थोडी कच्ची आहे. पण आजकाल तिला या खेळाची ओढ लागली आहे. त्यासाठी कतरिना फावल्या वेळेत मिळेल त्या जागी क्रिकेट खेळते. कतरिनाच्या साथीला अंगद बेदीही दिसतो. अंगद  अंगद स्वतः क्रिकेटर आहे. तसेच माजी क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा असल्यामुळे त्याला क्रिकेटचं वेड असणं स्वाभाविक आहे. 

हळूहळू कतरिना खेळातील बारकावे शिकत आहे. त्यामध्ये सुधार करत आहे. असेही सांगण्यात आले आहे. ‘टायगर जिंदा है’ या सिनेमातून सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. अंगद बेदीचीही या सिनेमात फार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.  जिथे ‘एक था टायगर’ हा सिनेमा संपवण्यात आला होता तिथून ‘टायगर जिंदा है’चे कथानक पुढे सरकणार आहे. अली अब्बास झफर दिग्दर्शित हा सिनेमा या वर्षाअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.