कतरीनाने इन्स्टाग्रामवर जुन्या आठवणींना दिला उजाळा

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरीना कैफ पुन्हा एकदा आपल्या हॉट अंदाजात इन्स्टाग्रामवर झळकली आहे. नुकताच तिने आपला एक फोटो शेअर केला. ज्यामुळे चाहत्यांच्या मनात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 24, 2017, 04:41 PM IST
कतरीनाने इन्स्टाग्रामवर जुन्या आठवणींना दिला उजाळा title=

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरीना कैफ पुन्हा एकदा आपल्या हॉट अंदाजात इन्स्टाग्रामवर झळकली आहे. नुकताच तिने आपला एक फोटो शेअर केला. ज्यामुळे चाहत्यांच्या मनात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

अभिनेता सलमान खान याच्यासोबत कतरीना 'टायगर जिंदा हैं' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे शुटींगही नुकतेच पूर्ण झाले आहे. फोटोमध्ये कतरीना काहीशी रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. 'टायगर जिंदा हैं'चे शूटींग संपल्यावर तिने शाहरूख खानसोबतच्या पूढच्या प्रोजेक्टबाबत काम सुरू केले आहे. अर्थात त्यामुळे कतरीनाचे शेड्यूल पुन्हा एकदा बिझी झाले आहे. तरीही बिझी शेड्यूलमधून तिने आपला एक हॉट अंदाजातला हटके फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. प्राप्त माहितीनुसार, कतरीनाने शेअर केलेला हा फोटो जुनाच आहे.

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

कतरीनाने जुना फोटो शेअर करने हे तिच्या चाहत्यांसाठी नवे होते. कारण, यापूर्वी तिने अशा पद्धतने जुना फोटो क्वचितच पोस्ट केला आहे. तिने हा फोटो पोस्ट करताच सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. कतरीना सोशल मीडियासाठी नवी नाही. कारण, तब्बल ५० लाख फॉलोअर्स असलेली सेलिब्रेटी हा ट्प्पा तिने केव्हाच पार केला आहे. उल्लेखनिय असे की, कतरीनाने इन्स्टाग्रामवर एण्ट्री करून केवळ चारच महिने झाले आहेत. त्यामुळे अवघ्या चार महिन्यातच तिने ५० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.