सलमानसाठी कतरिनाचे सिद्धीविनायकाकडे गाऱ्हाणे

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या शिक्षेबाबत आज निर्णय होणार आहे

Updated: Apr 5, 2018, 11:20 AM IST
सलमानसाठी कतरिनाचे सिद्धीविनायकाकडे गाऱ्हाणे title=

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या शिक्षेबाबत आज निर्णय होणार आहे. सलमान खानसोबत इतर 5 कलाकार आज जोधपुर कोर्टात उपस्थित राहणार आहे. सलमान खान यात प्रमुख आरोपी आहे तर सलमान खान सह तब्बू, नीलम, सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे यांच्याबाबतही शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 

या प्रकरणात सलमानची सुटका व्हावी यासाठी बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने सिद्धीविनायकाकडे गाऱ्हाणे घातलेय. कतरिना आणि सलमानची बहीण अर्पिता यांनी गुरुवारी रात्री बारा वाजता सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. 

किती वर्षांची शिक्षा?

ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्री दोन काळवीटांची  शिकार केली, असा सलमानवर आरोप ठेवण्यात आलाय. सलमानवरील हा सिद्ध झाल्यास त्याला सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते.  सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

काय आहे हे प्रकरण?

'हम साथ साथ हैं ' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी शिकार केली. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला.