अंबानींच्या पार्टीत कतरिनानं परिधान केलेल्या ड्रेसची किंमत माहीत आहे का?

बॉलिवूड आणि कॉर्पोरेट जगताचं नात काही नवीन नाही. मुंबईत अंबानी कुटुंबीयांची एखादी पार्टी असेल आणि त्यात ग्लॅमर इंडस्ट्रीतले तारे-तारका उपस्थित नसतील असं होणारच नाही. नुकत्याच नीता आणि मुकेश अंबानींनी दिलेल्या एका पार्टीत इतर अनेक स्टार्सप्रमाणेच कतरिना कैफही दाखल झाली होती.

Updated: Mar 29, 2018, 10:59 AM IST
अंबानींच्या पार्टीत कतरिनानं परिधान केलेल्या ड्रेसची किंमत माहीत आहे का? title=

मुंबई : बॉलिवूड आणि कॉर्पोरेट जगताचं नात काही नवीन नाही. मुंबईत अंबानी कुटुंबीयांची एखादी पार्टी असेल आणि त्यात ग्लॅमर इंडस्ट्रीतले तारे-तारका उपस्थित नसतील असं होणारच नाही. नुकत्याच नीता आणि मुकेश अंबानींनी दिलेल्या एका पार्टीत इतर अनेक स्टार्सप्रमाणेच कतरिना कैफही दाखल झाली होती.

नीता-मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आणि श्लोका यांच्यासाठी मुंबईत एका ग्रॅन्ड पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. दोघांच्या साखरपुड्यानंतर अंबानी यांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत शाहरुख खान पासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित झाले होते. कतरिना कैफ या कार्यक्रमात पीच कलरच्या एका साध्याशा ड्रेसमध्ये दिसली होती. पण, हा काही साधासुधा ड्रेस नव्हता. 

कतरिनाचा हा ड्रेस जितका सुंदर दिसत होता... तितकीच त्याची किंमत तुम्हाला धक्का देऊ शकते. डिझायनर लेबल लुइसा बॅकारिया यांच्या २०१७ फॉल विंटर कलेक्शनची कॉपी असलेल्या या ड्रेसची किंमत ३२४८ डॉलर म्हणजेच जवळपास २.१० लाख रुपये आहे. 

कतरिनाचा हा लूक उन्हाळ्यातील पार्ट्यांसाठी एकदम परफेक्ट आहे परंतु तो खरेदी करणं मात्र सामान्यांच्या आवाक्यापलिकडचं आहे. कतरिनाचा हा लूक सोशल मीडियावर वेगानं वायरल होतोय. 

The absolutely stunning @katrinakaif like a #woodscharmer in #luisabeccaria #LuisaBeccaria_Stars

A post shared by Luisa Beccaria (@luisabeccaria_official) on

अंबानींच्या या पार्टीत ऐश्वर्या राय बच्चन छोट्या आराध्यासहीत दाखल झाली होती. ऐश्वर्य काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये तर आराध्या गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसली. या पार्टीत करण जोहर, किरण राव, जॉन अब्राहम यांसारखे अनेक सितारे दाखल झाले होते.

आकाश याची भावी पत्नी श्लोका ही बिझनेसमन रसेल मेहता यांची सगळ्यात छोटी मुलगी आहे. आकाश आणि श्लोका यांनी धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलंय. हे दोघं येत्या डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकू शकतात.