बंद होणार केबीसी-९, सुरु होणार ३ नवे शो

बिग बी अमिताभ बच्चन यांचा हा शो प्रेक्षकांना खूपच आवडत आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 13, 2017, 07:04 PM IST
बंद होणार केबीसी-९, सुरु होणार ३ नवे शो title=
File Photo

नवी दिल्ली : २८ ऑगस्टपासून सुरु झालेला 'कौन बनेगा करोडपती-९' टीआरपीच्या चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांचा हा शो प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. मात्र, केबीसीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांचा हा शो खूपच खास आहे आणि प्रेक्षकांना टीव्हीसमोर बसण्यास भाग पाडतो. मात्र, प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण, KBC-९ लवकरच ऑफ एअर होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीजन ९ चा शेवटचा एपिसोड २३ ऑक्टोबर रोजी टेलिकास्ट होणार आहे. Spotboye च्या एका रिपोर्टनुसार, २३ ऑक्टोबर रोजी केबीसी-९ चा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होईल. हा शो बंद झाल्यानंतर याच्या ऐवजी नवे कार्यक्रम सुरु करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.

२३ ऑक्टोबरनंतर सोनी टीव्हीवर रात्री ९ ते १०.३० हा स्लॉट तीन नव्या शोजसाठी देण्यात आला आहे. स्पॉटबॉय डॉट कॉम ने दिलेल्या वृत्तानुसार, 'पहारेदार पिया की' चा सीक्वल, जायद खानचा शो 'हासिल' आणि 'एक दीवाना था' हे तीन शो केबीसी-९ च्या ऐवजी टेलिकास्ट होणार आहेत.

'पहारेदार पिया की' याचा सिक्वल 'रिश्ते लिखेंगे हम नए' याला रात्री ९ वाजताचा प्राईम टाईम स्लॉट देण्यात आला आहे. या शोमधून तेजस्वी प्रकाश आणि रोहित सुचंती पूनरागमन करणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात बिकानेर येथे सुरु झाली आहे आणि प्रोमोही टेलिकास्ट होण्यास सुरुवात झाली आहे.

रात्री ९.३० वाजता जायद खान सोनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या समोर असणार आहे. 'हासिल' या शोमध्ये जायद खान मुख्य भूमिकेत असणार आहे. या शोचा पहिला एपिसोड ३० सप्टेंबर रोजी टेलिकास्ट होणार आहे. तर, रात्री १० वाजता 'एक दिवाना था' हा नवा शो टेलिकास्ट होणार आहे.