भरत जाधवला आहे 'ही' विक्षिप्त सवय

जवळच्या व्यक्तीने केला खुलासा 

भरत जाधवला आहे 'ही' विक्षिप्त सवय

मुंबई : महाराष्ट्राला खळखळून हसवणारा भरत जाधव. ज्याने आपल्या नाटकांनी आणि सिनेमांनी प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन केलं. सही रे सही, ऑल द बेस्ट, श्रीमंत दामोदर पंत, लोचा झाला रे, अगं बाई अरेच्या, जत्रा, याहून अधिक कलाकार प्रेक्षकांसमोर सादर केल्या. भरत जाधव, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे या तिघांची मैत्री महाराष्ट्राने पाहिली. सामान्य कुटुंबातील आलेल्या या तिघांनी मराठी प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन केलं. हे तिघे नुकतेच 'नंबर वन यारी' या कलर्स मराठीवरील कार्यक्रमात आले होते. 

ही आहे भरत जाधवची विक्षिप्त सवय 

आपल्याला माहितच आहे. काळाचौकीच्या परिसरात भरत जाधवचं बालपण गेलं. भरत जाधवचे वडील हे टॅक्सी ड्रायव्हर होते. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये भरत जाधवचं आयुष्य गेलं. 'लोकधारा'मधून भरत जाधव नाटकांमध्ये काम करू लागला. आणि नंतर त्याने याच क्षेत्रात नाम कमावलं. आपल्याला माहितच आहे भरत जाधवला गाड्यांची भरपूर आवड आहे. मराठीतील भरत जाधव हा पहिला असा अभिनेता आहे ज्याची स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आहे. भरतला गाड्यांप्रमाणेच घरांची देखील प्रचंड आवड आहे. घर खरेदी करणं हे भरतला अतिशय आवडतं. 'नंबर 1 यारी' कार्यक्रमात अंकुश आणि केदार शिंदेने भरत जाधवची घर खरेदी करण्याची सवय सांगितली. 

हा आहे किस्सा 

एकदा भरत आणि कुटुंबीय सिनेमा पाहायला गेले होते. तेव्हा भरत त्याला A सर्टिफिकेट असलेला सिनेमा पाहत होता. आणि त्याचे कुटुंबिय सुपरमॅन हा सिनेमा पाहत होते. यावेळी भरतचा सिनेमा अगोदर सुटला. तेव्हा भरत वडाळ्यात सिनेमा जवळ असलेल्या एका कंस्टक्शन कामाच्या इथे गेला आणि त्याने 11 व्या माळ्यावर घर खरेदी केलं. आणि पिक्चर सुटल्यावर बायकोला भरत जाधवने हे गोड सरप्राईज दिलं. 

तसेच दुसरा किस्सा असा आहे की, भरत जाधवचा कोल्हापूरला बंगला आहे. तिथेच एक फ्लॅट भरतला आवडला. त्याने त्या फ्लॅटबद्दल चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की, त्या मालकाला पैशांची खूप गरज आहे आणि त्याला तो फ्लॅट विकायचा आहे. यावेळी भरत जाधव गोव्यात सिनेमाचं शुटिंग करत होता. त्याने प्रोड्युसरकडून 2 लाख अॅडव्हान घेऊन गोव्यातून सकाळी 4.30 ला गाडी घेऊन सकाळी 7 वाजता घर मालकासोबत मिटिंग करून ते घर विकत घेतलं. तर भरत जाधवला घर आणि गाडी विकत घेण्याची सवय आहे. 

का जडली आहे सवय 

भरत जाधवचा बराच काळ हा लहान घरात गेला. त्यामुळे स्वतःकडे मोठं घर असावं ही त्याची इ्च्छा आता सवयीत बदलली आहे. त्याचप्रमाणे भरत जाधवला गाड्यांच वेड देखील त्याच्या वडिलांमुळे जडली आहे.  

भरत जाधवचं नवं नाटकं

जुलै महिन्यात मराठी माणसाला पुन्हा एकदा एन्टरटेन करण्यासाठी भरत जाधव सज्ज झाला आहे. वन्स मोअर हे नाटक घेऊन भरज ताधव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकांत ऋुजुता देशमुख असून निपुण धर्माधिकारी या नाटकाचं दिग्दर्शन करत असून स्नेहा देसाई यांनी हे नाटक लिहिलं आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close