गुजराती इनिंगसाठी केदार शिंदे सज्ज

आतापर्यंत मराठी रंगभूमी, मालिका आणि सिनेमांमध्ये आपलं वेगळंपण दाखवणारे लेखक - दिग्दर्शक केदार शिंदे.  केदार शिंदे मराठी पाठोपाठच आता गुजराती रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यानं दिग्दर्शित केलेल्या गुजराती नाटकाचा शुभारंभ नुकताच मुंबईत झाला…

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 14, 2017, 05:05 PM IST
गुजराती इनिंगसाठी केदार शिंदे सज्ज

मुंबई : आतापर्यंत मराठी रंगभूमी, मालिका आणि सिनेमांमध्ये आपलं वेगळंपण दाखवणारे लेखक - दिग्दर्शक केदार शिंदे.  केदार शिंदे मराठी पाठोपाठच आता गुजराती रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यानं दिग्दर्शित केलेल्या गुजराती नाटकाचा शुभारंभ नुकताच मुंबईत झाला…

मराठी कलाकार गुजराती रंगभूमी गाजवताना दिसत असताना आता आपला मराठमोळा लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे देखील सज्ज झाले आहेत.  'नाटक ना नाटक नु नाटक' असं गुजराती नाटक घेऊन तो तिथल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. 'द प्ले दॅट गोज राँग' या गाजलेल्या अमेरिकन नाटकाचा हा अधिकृत रिमेक आहे. बॉलिवूडस्टार शर्मन जोशीनं या नाटकाची निर्मिती केली आहे.

केदारनं दिग्दर्शित केलेली 'सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदर पंत', 'गेला उडत', 'तू तू मी मी' यांसारखी दर्जेदार नाटकं मराठी रंगभूमीवर गाजली. मधल्या काळात त्यानं अभिनेता शर्मन जोशी सोबत 'राजू राजा राम और मैं' हे नाटक हिंदी रंगभूमीवर आणलं होतं. त्यानंतर आता तो गुजराती रंगभूमीवर हे नाटक घेऊन येतोय. 'द प्ले दॅट गोज राँग' हे नाटक पाश्चिमात्य देशात अतिशय लोकप्रिय असून, या नाटकानं आजवर अनेक मानाची पारितोषिकं मिळवली आहेत. त्यामुळे आता मराठी प्रेक्षकांपाठोपाठ गुजराती प्रेक्षकांवर केदार शिंदेची जादू किती पसरते हे पाहणं कौतुकास्पद आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close