PHOTO : 'कॉफी किंग'सोबत अर्जुन-जान्हवी कपूर

'या सगळ्या गोंधळात माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट...'

Updated: Oct 6, 2018, 01:00 PM IST
PHOTO : 'कॉफी किंग'सोबत अर्जुन-जान्हवी कपूर title=

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर करण जोहरच्या प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या जवळपास प्रत्येक सीझनमध्ये दिसलाय. परंतु, यावेळी मात्र अर्जुनची खास एन्ट्री होणार आहे. कारण या शोमध्ये अर्जुन पहिल्यांदाच त्याची सावत्र बहिण जान्हवी कपूर हिच्यासोबत दिसणार आहे. शुक्रवारी भाऊ-बहिणीची या जोडीनं करण जोहरच्या कार्यक्रमाच्या नव्या कार्यक्रमाची शुटींग पूर्ण केलीय. या शुटींगचे काही फोटो अर्जुन, जान्हवी आणि करण तिघांनीही शेअर केलेत. 

arjun kapoor

 

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर सिनेनिर्माते बोनी कपूर यांचं कुटुंब अनेकदा एकत्र दिसतं. अर्जुन आणि अंशुला बोनी कपूर यांची पहिली पत्नीची मुलं आहेत... तर जान्हवी आणि खुशी श्रीदेवी यांच्या मुली आहेत. 

arjun kapoor

अर्जुन कपूरनं जान्हवीसोबत आपले काही फोटो शेअर करत लिहिलंय, 'या सगळ्या गोंधळात माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट... माझ्यासाठी एक रिमाइंडर... कुटुंब... करण आम्हाला बोलावण्यासाठी धन्यवाद... तुला माहित आहे मी परत येणार आहे'.

arjun kapoor

अर्जुन अनेकदा करणच्या कार्यक्रमात दिसलाय. परंतु, जान्हवीसाठी मात्र ही पहिलीच संधी आहे. 

'कॉफी विथ करण'चा सहावा सीझन २१ ऑक्टोबर रोजी टेलिकास्ट होणार आहे.