लिफ्टमध्ये अडकली क्रिती सेनन... ट्विटर मागितली मदत

बॉलिवूड कलाकार सतत सोशल मीडियामध्ये अ‍ॅक्टीव्ह असतात. कोण कुठे आहे ? काय करतोय इथपासून ते प्रोजेक्टच्या माहितीपर्यंत सारे अपडेट्स कलाकार देतात मात्र आज क्रिती सेनने केलेल्या ट्विटमुळे तिचे चाहते चिंतेत पडले होते.  

Updated: Feb 9, 2018, 10:17 PM IST
लिफ्टमध्ये अडकली क्रिती सेनन... ट्विटर मागितली मदत

मुंबई : बॉलिवूड कलाकार सतत सोशल मीडियामध्ये अ‍ॅक्टीव्ह असतात. कोण कुठे आहे ? काय करतोय इथपासून ते प्रोजेक्टच्या माहितीपर्यंत सारे अपडेट्स कलाकार देतात मात्र आज क्रिती सेनने केलेल्या ट्विटमुळे तिचे चाहते चिंतेत पडले होते.  

लिफ्टमध्ये अडकल्याची दिली माहिती 

मुंबईमध्ये क्रिती सेनन एका लिफ्टमध्ये अडकली असल्याची माहिती तिने ट्विटरच्या माध्यमातून दिली. पण यामधील इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लिफ्टमध्ये अडकलेल्या क्रितीला मोबाईलवर 3जी नेट मिलत असल्याची माहिती तिने दिली होती. 

 

 

क्रितीच्या या ट्विटनंतर तिच्या फॅन्सनी तिची विचारपूस करायला सुरूवात केली. दरम्यान क्रितीने आएशा नावाच्या एका मुलीला टॅग करून मला लिफ्टमधून बाहेर काढायला मदत कर... मला मीटिंगला जायला उशीर होतोय  असा मेसेज लिहला 

 

काही ट्विटवर रिप्लाय करताना तिने काळजी करू नका माझा मॅनेजर मला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय ... मला भूक लागलीय अशी माहिती तिने ट्विटमध्ये दिली होती. 

 

एका फॅनने घाबरू नकोस चॉकलेट खा असा सल्लादेखील दिला. त्यानंतर क्रितीने मी बॅगेत शोधतेय ... असा त्याला रिप्लाय केला.  

अखेर लिफ्टमधून बाहेर पडण्याची माहिती क्रितीने दिल्यानंतर तिच्या अनेक फॅन्सच्या जीवात जीव आला. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close