कुणालने शेअर केला मुलगी इनायाचा फोटो...

अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांना अलीकडेच कन्यारत्न लाभले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 14, 2017, 08:28 PM IST
कुणालने शेअर केला मुलगी इनायाचा फोटो...

मुंबई : अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांना अलीकडेच कन्यारत्न लाभले. ही बातमी जरी सोशल मीडियावर झळकली असली तरी त्या चिमुकलीचे दर्शन काही झाले नव्हते. मात्र बालदिनी तिची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. कारण इनायाचे डॅड कुणाल खेमू यांनी इनायाचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ती फारच सुंदर, क्युट आणि लोभस दिसत आहे. 

बालदिनाच्या मुहूर्तावर इनायाची सोशल मीडियावर एंट्री झाली आहे. इनायाचा हा फोटो शेअर करताना कुणाल खेमूने लिहिले, "मी जगातील सर्व मुलांना बालकदिनाच्या शुभेच्छा देतो. तुमचे बालपण आम्हा मोठ्यांना एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरणा देते. हॅपी चिल्ड्रन्स डे." 

इनायाचा मामेभाऊ म्हणजेच तैमूर अली खान सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याच्या क्युटनेसमुळे त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. आता त्याच्यासोबत इनाया देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरेल. 

कुणाल आणि सोहा २०१५ मध्ये विवाहबद्ध झाले. यावर्षी २९ सप्टेंबरला त्यांच्या आयुष्यात इनाया नावाच्या परीचे आगमन झाले. जन्मानंतर लगेच सोहाने इनायाचा डॅडसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र त्यात इनायाचा चेहरा दिसला नव्हता.